VBA News : शैलेश गवईंसह पाच जण ‘वंचित’मधून बडतर्फ; वानखडेंना पाठिंबा देणं भोवलं...

Lok Sabha election 2024 : शैलेश गवई यांनी आज सकाळीच महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मतांची विभागणी होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले होते.
Sarkarnama
Prakash Ambedkar, Shailesh Gawai Prakash Ambedkar, Shailesh Gawai
Published on
Updated on

Amravati News : अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या (VBA News) जिल्हाध्यक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला परस्पर पाठिंबा जाहीर केल्याने पक्षात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता वंचितकडून जिल्हाध्यक्षांसह पाच जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. या मतदारसंघात वंचितने यापुर्वीच रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

अमरावती मतदारसंघात आघाडीकडून बळवंत वानखडे (Balwant Wankhade) तर महायुतीकडून नवनीत राणा मैदानात आहेत. वंचितने (Vanchit Bahujan Aaghadi) आनंदराज आंबेडकर यांना काही दिवसांपुर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, मतांची विभागणी टाळण्यासाठी आपण वानखडे यांना पाठिंबा देत असल्याचे वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलश गवई (Shailesh Gawai) यांनी आज सकाळी जाहीर केले आहे.

Sarkarnama
Madha Lok Sabha : माढ्याचा तिढा सगळ्याच निवडणुकांत कोणाचा न कोणाचा खोडा!

गवई यांच्या या भूमिकेमुळे वंचितमध्ये फूट पडल्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यानंतर वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर (Rekha Thakur) यांनी गवई यांच्यासह पाच जणांना पक्षातून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे. गवई यांच्यासह अंजनगाव सुर्जीचे तालुकाध्यक्ष सुनील राक्षस्कर, महिला आघाडी शहाध्यक्ष भारती गुढधे, सचिव रेहना खान आणि महासचिव मेराज खान यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमरावती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उघडपणे पक्षाच्या अधिकृत निर्णयाशी द्रोह केला आहे. यामुळे पक्ष शिस्तीचा भंग झालेला आहे. त्यामुळे प्रा. शैलेश गवई व त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्वांना पक्षातून त्यांच्या पदासहित बडतर्फ करण्यात आल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.

काय म्हटले होते गवईंनी?

रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला चांगली वागणूक दिली जात नाही. सालगडी असल्याप्रमाणे वागवले जाते. अनेक दिवसांपासून आनंदराज आंबेडकरांसोबत आहोत. पण वंचितला घेऊन प्रचार करण्यासाठी कोणतेही नियोजन केले जात नाही. उलट आमच्याच पदाधिकाऱ्यांवर आक्षेप घेतले जात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

मतांचे ध्रुवीकरण थांबवण्यासाठी तसेच इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना विचारात घेऊन आज मी महविकास आघाडीचे समाजातीलच सर्वसामान्य उमेदवार बळवंत वानखडे (Balwant Wankhade) यांना जाहीर पाठिंबा देत आहे. त्यांचा प्रचारही आम्ही करणार असल्याचे गवई यांनी स्पष्ट केले.

Sarkarnama
Balwant Wankhade News: पठ्ठ्यानं चक्क स्टॅम्प पेपरवर लिहून दिला शपथनामा; निवडून आल्यावर कोणती विकासकामे करणार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com