Nagpur News: प्रभाग ठरले! आता उत्सुकता महापालिकेच्या निवडणुकीची

Nagpur NMC elections 2025 ward delimitation: नागपूर महानगरपालिकेत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असल्याने, एकूण ७८ जागा महिलांसाठी राखीव राहतील. यामध्ये ६० जागा सोडून १२ जागा अनुसूचित जाती महिलांसाठी आणि ६ जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Nagpur Municipal Corporation
Nagpur Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

✅ 3-Point Summary

  1. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी नव्या प्रभाग रचनेचा मसुदा तयार झाला असून, तो ५ ऑगस्टपूर्वी नगर विकास विभागाला सादर होणार आहे.

  2. प्रभाग रचनेत फारसे बदल न करता किरकोळ फेरफार केल्याचा आरोप असून, मागील निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवले होते.

  3. निवडणूक पुढील डिसेंबर किंवा जानेवारीत होण्याची शक्यता असून, महिलांसाठी ५०% आरक्षणाच्या आधारावर आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

Nagpur News: सध्या सर्वांच्या नजरा महापालिकेच्या निवडणुकीकडे लागल्या आहेत. इच्छुक आणि उत्सुक कार्यकर्ते कामाला लागले आहेत. प्रभाग रचना कशी होणार आणि कुठले भाग आपल्या प्रभागाला जुळणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. महापालिकेने नव्याने प्रभाग रचनेचा मसुदा तयार केली आहे. त्यावर समितीच्या स्वाक्षऱ्या झाल्या असून पाच ऑगस्टपूर्वी नगर विकास भागाला सादर मसुदा सादर केला जाणार आहे. प्रभाग रचनेत किरकोळ बदल झाले असल्याचा दावा केला जात आहे.

राज्यात भाजपची सत्ता असतानाचा २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक घेण्यात आली होती. त्यावेळी भाजपने आपल्या सोयीने प्रभागांची रचना केली होती असा आरोप विरोधकांचा आहे. यावेळीसुद्धा राज्यात भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे फारकाही बदल होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येते. फक्त नव्याने रचना केली हे दाखवण्यासाठी किरकोळ बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मागील निवडणुकीत भाजपचे १०८ नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसचे २९, बसपाचे १२ नगरसेवक होते. शिवसेना दोन, राष्ट्रवादी एक यांना फक्त हजेरी लावता आली होती.

नियमांनुसार, प्रारूप प्रभाग रचनेच्या घोषणेनंतर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षणाची सोडत काढली जाईल. कोणत्या प्रभागात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला आणि पुरुषांसाठी प्रभाग राखीव असतील, हे या सोडतीत ठरवले जाईल.

Nagpur Municipal Corporation
Mahadevi Elephant Case: कोल्हापूरकरांच्या दबावापुढे 'वनतारा' प्रशासन झुकलं : खासदार माने अन् महाडिकांचे शिष्टाईचे प्रयत्न सुरु

तज्ज्ञांच्या मते, १५६ सदस्य असलेल्या नागपूर महानगरपालिकेत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असल्याने, एकूण ७८ जागा महिलांसाठी राखीव राहतील. यामध्ये ६० जागा सोडून १२ जागा अनुसूचित जाती महिलांसाठी आणि ६ जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागपूर मनपाने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जरी प्रभाग रचनेचा मसुदा तयार करण्यात असला तरी प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप देण्याच्या प्रक्रियेतील दीर्घ कालावधी पाहता मनपा निवडणुकांबाबत अद्यापही शंका व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी अलीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका तीन टप्प्यात होईल असा अंदाज वर्तविला होता. २०१७मध्ये नगर पालिका, जिल्हा परिषद त्यानंतर महापालिकेची निवडणूक घेण्यात आली होती. निवडणूक आयोग हाच फॉर्म्युला कायम ठेवणार असल्याचे सांगण्यात येते. हे बघता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्यात निवडणूक होईल असे सांगण्यात येते.

Q1: नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना कधी सादर होणार आहे?
A1: ५ ऑगस्टपूर्वी नगर विकास विभागाला सादर केली जाणार आहे.

Q2: यावेळी प्रभाग रचनेत मोठे बदल झाले आहेत का?
A2: नाही, फक्त किरकोळ बदल झाल्याचा दावा आहे.

Q3: महिलांसाठी किती जागा राखीव असतील?
A3: एकूण ७८ जागा महिलांसाठी राखीव राहण्याची शक्यता आहे.

Q4: महापालिका निवडणूक कधी होणार आहे?
A4: डिसेंबर शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीत होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com