Amit Shah On Congress : काँग्रेसचा काळ म्हणजे दंगलीचा काळ; अमित शाहांनी घटनांची यादीच दिली

Amit Shah In Lok Sabha : काँग्रस सरकारच्या कारभाराचे शाहांनी काढले वाभाडे
Amit Shah, Pandit Jawaharlal Neharu, Indira Gandhi, Rajiv Gandhi
Amit Shah, Pandit Jawaharlal Neharu, Indira Gandhi, Rajiv GandhiSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : मणिपूर हिंसाचारावरून संसदेत 'एनडीए' आणि 'इंडिया'त रणकंदन सुरू आहे. विरोधकांच्या हल्ले परतवून लावताना केंद्रीय मंत्री अमित शाह एकटेच जोमाने खिंड लढवत आहेत. मणिपूरबाबत मोदी सभागृहात येऊन निवेदन देत नाहीत असा आरोप करून विरोधकांनी त्यांच्याविरोधत अविश्वास प्रस्ताव आणला. प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेत विरोधकांनी केलेला प्रत्येक हल्ला शाहांनी परतवून लावताना काँग्रेसच्या नेहरूंपासून राहुल गांधीपर्यंत सर्व नेत्यांचा समाचार घेतला. त्यांनी केलेल्या चुकांसह काँग्रेस काळात झालेल्या दंगल, हिंसाचारावर बोट ठेवले. (Latest Political News)

मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरून काँग्रेसने भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. देश-विदेशात फिरणारे मोदी तीन महिने पेटत असलेल्या मणिपूरमध्ये गेले नाहीत, असा टीका विरोधक करत आहेत. मोदींच्या या भूमिकेवर बोट ठेवत काँग्रसचे खासदार गौरव गोगोईंनी तीन प्रश्न विचारले आहेत. गोगोईंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना शाहांनी काँग्रेसच्या काळात झालेल्या दंगल, हिंसाचारांची यादी वाचूनच उत्तर दिले. तसेच काँग्रेसच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराचा पाढाही शाहांनी वाचला.

Amit Shah, Pandit Jawaharlal Neharu, Indira Gandhi, Rajiv Gandhi
Sanjay Raut On Flying Kiss : राहुल गांधींनी 'फ्लाईंग किस' दिला तर त्यात काय झालं? राऊतांनी केलं समर्थन !

शाह म्हणाले, "सर्वात जास्त दंगली, हत्याकांड कुणाच्या काळात झाले असेल ते काँग्रेसच्या काळात झाले आहे. पंतप्रधान जावहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या काळात झाल्या आहेत. त्यावेळी विरोधकांनी कुठल्याही पक्षाला जबाबदार धरले नाही. १५ दिवस सभागृहाचे काम थांबवले नाही. पंतप्रधानांचीच उत्तर द्यावे, असा आग्रह धरला नाही. सध्या मात्र विरोधक मणिपूरवरून राजकारण करत असून ही लाजीरवाणी बाब आहे." अशा शब्दात काँग्रेसचा समाचार घेत अमित शाहांनी 'यूपीए' काळात झालेल्या हत्याकांडांची यादी सांगितली.

Amit Shah, Pandit Jawaharlal Neharu, Indira Gandhi, Rajiv Gandhi
Raghunathdada Patil On Bachchu Kadu: आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले, ते राज्यमंत्रीच राहिले; त्यांनी त्यांची किंमत..

काँग्रस सरकारच्या कारभाराचे काढले वाभाडे

  • असममध्ये १५ फेब्रवारी २७ मार्च १९८७ मध्ये झालेल्या दंगलीत ७५० लोक मारले गेले.

  • आंध्रप्रदेश (हैदराबाद) ६ डिसेंबर ते १९९० ते १९९१ मध्ये १४३ लोकांना जीव गमवावा लागला.

  • उत्तर प्रदेश (मुरादाबाद) ऑगस्ट १९८० मध्ये झालेल्या दोन दिवसाच्या हिंसाचारात तब्बल एक हजार लोक मारले गेले.

  • मेरठमध्ये १८ मे ते २३ जुलै १९८७ मध्ये झालेल्या दंगलीत १८७ लोकांचा मृत्यू झाला.

  • अलिगडमधील हत्याकांडात ११२ जणांचा जीव गेला.

  • गुजरातमध्ये १८ फेब्रवारी ते ३१ जुलै १९८५ दरम्यान झालेल्या दंगलीत २०६ लोक मारले गेले.

  • झारंखडमध्ये १९६३ साली झालेल्या हिंसाचारात १८६ जाणांना जीव गमवला.

  • पश्चिम बंगालमध्ये १९६४ मध्ये झालेल्या दंगलीत तब्बल एक हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

  • बिहरामधील जमशेदपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात १२० जण दगावले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com