Video Vijay Wadettivar News : अण्णा जागे झाले याचा आनंद; वडेट्टीवारांनी लगावला टोला

Congress Political News : भाजपला देशात अडीचशेसुद्धा पार करता आले नाही. महाराष्ट्रात त्यांचा पक्ष एक आकड्यावर आला. याचा अर्थ नरेंद्र मोदी यांना जनतेनी नाकारले आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
Vijay Wadeetivar, Anna Hajare
Vijay Wadeetivar, Anna Hajare Sarkarnama
Published on
Updated on

राजेश चरपे

Nagpur News : लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसला असला तरी सत्ताधारी व विरोधक एकमेकांना घेरण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या क्लिन चिट देण्यास विरोध दर्शवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे अण्णा जागे झाले याचा आनंद होत असल्याचा टोला विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या क्लिन चिट देण्याचा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न राज्य शासनाच्यावतीने सुरू आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांनी यास विरोध दर्शवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. ते जागे झाले याचा आनंद आहे. महायुतीच्या काळात महाराष्ट्रात घोटाळे झाले त्यावेळेस ते बोलले नाहीत. भाजपच्या दहा मंत्र्यांवर गंभीर आरोप होते. त्यावेळी ते आजारी होते. झोपी गेले होते, असा टोला विजय वडेट्टीवार (Vijay wadettivar) यांनी लगावला. (Vijay Wadettivar News)

भाजपला देशात अडीचशेसुद्धा पार करता आले नाही. महाराष्ट्रात त्यांचा पक्ष एक आकड्यावर आला. आमचे 79 उमेदवार एक लाख मतांच्या फरकांनी पराभूत झाले आहेत. याचा अर्थ नरेंद्र मोदी यांना देशातील जनतेनी नाकारले आहे. उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती दावे करीत असले तरी त्यांच्यामुळेच भाजपने विश्वासहर्ता गमावली असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

आता महाविकास आघाडीला कोणीही हरवू शकणार नाही. राज्यातील महायुतीचे सरकार अनैतिक आहे. त्याला सत्तेबाहेर घालवल्याशिवाय शांत बसणार नाही. महायुतीच्या काळात दोन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बेरोजगारीमुळे आता युवकही आत्महत्या करीत आहेत.

भाजपचे (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महाविकास आघाडीला मत देऊ नका, असे सांगत सुटले आहेत. त्यांना आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढवायची आहे का ? असा सवालही यावेळी वडेट्टीवार यांनी केला.

Vijay Wadeetivar, Anna Hajare
Devyani Pharande : आमदार देवयानी फरांदे यांची हॅटट्रिक शक्य आहे का?

सर्वच पक्षांना अधिकाधिक आपले आमदार निवडून आणणायचे आहेत. त्यामुळे 288 जागांची तयारी केली जात. त्यात वावगे काही नाही. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ महाविकास आघाडी फुटली असा होता नाही. सर्वांचे हायकमांड दिल्लीत बसले आहेत. जागा वाटपाचा निर्णय ते घेतील. नेत्यांना आपापल्या पक्षासाठी काही वक्तव्य करावे लागते. ते केले पाहिजे असे सांगून वडेट्टीवार यांनी संजय राऊत आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्या वक्तव्याचे समर्थन केले.

तुष्टीकरण हा नेहमीच विश्व हिंदू परिषद आणि भाजपचा अजेंडा राहिला आहे. वक्फ बोर्डाला निधी दिल्याने एवढा आकांत तांडव करण्याची गरज नाही. रामदेव बाबाच्या कंपनीला एक रुपये दराने नागपूरच्या मिहान प्रकल्पात हजार कोटींची जागा दिली. त्यावर कोणी काही बोलत नाही. रामदेव बाबांचे उत्पादने बोगस आहेत. अनेकांनी यावर आक्षेप घेतले आहेत, याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले.

Vijay Wadeetivar, Anna Hajare
Raj Thackeray: बिनशर्त पाठिंबा देऊनही मनसेच्या वाट्याला अवहेलनाच!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com