Vijay Wadettiwar : 'सारा खटाटोप अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी'; वडेट्टीवारांचा दावा

Vijay Wadettiwar on Ajit Pawar : अपमान केला जात आहे. जखम मोठी झाली की आपोआप माणसे दूर होतात, असा टोला विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न त्यांच्याच मित्रपक्षांमार्फत सुरू आहेत. कोणी थेट आरोप करतो तर कोणी बॅनर फाडत आहे. जेवढे दुखवता येईल तेवढे जखमेवर मीठ चोळण्याचा काम केले जात आहे. अपमान केला जात आहे. जखम मोठी झाली की आपोआप माणसे दूर होतात, असा टोला विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

सध्या अजित पवार स्वबळावर लढणार, काही जागांवर मैत्रिपूर्ण लढत होतील अशी चर्चा राज्यात सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री मुंबईत असताना अजित पवार (Ajit Pawar) त्यांना भेटले नाही. जातात विमानतळावर दोन्ही नेत्यांची भेट झाली. मैत्रीपूर्ण लढतीच्या चर्चांना अजित पवार यांनी नकार दिला आहे. या सर्व अफवा असल्याचा खुलासा केला असला तरी महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याचे दिसून येते.

Vijay Wadettiwar
Nana Patole : आरक्षणविरोधी कोण आहे, हे सांगण्यासाठी ज्योतिष्याची गरज नाही!

'महाविकास आघाडीचे नेतेही यावर बारीक लक्ष ठेऊन आहे. संधी मिळाताच युतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी यापूर्वीसुद्धा अजित पवार यांच्यावर पश्चातापावरून निशाना साधला होता. लोकसभेच्या निवडणुकीनंत अजित पवारांची उपयोगिता संपल्याने भाजपला त्यांना महायुतीतून दूर सारायचे असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला.

त्यांचे बॅनर फाडले जातात, बॅनरवर काळा पडदा टाकला जातो, बारामतीत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी एकदाही मुख्यमंत्र्याकडे बघितले नाही. सर्वांचे चेहरे पडले होते. हे महायुतीच्या परतीच्या प्रवासाची लक्षणे आहेत. श्रेयवादाची लढाई आणि सत्तेच्या लढाईमध्ये जो कमजोर दुवा असतो त्याला बाजूला केले जाते. तसेच प्रयत्न सध्या महायुतीमध्ये सुरू असल्याचे दिसून येते. पहिला नंबर अजित पवारांचा असेल आणि दुसरा नंबर एकनाथ शिंदेंचाही असू शकतो,' असेही भाकित वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

Vijay Wadettiwar
Manohar Parrikar : असेही मुख्यमंत्री जे टपरीवर चहा घ्यायचे, स्कूटरवरून फिरायचे...

फडणवीस यांच्यावरही साधला निशाना

देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिल्लीतून अनेक नेते पाठविले आहेत. त्यांच्यावर वॉच ठेवला जात आहे. अधिकार कमी केले जात आहे. सध्या त्यांचे पंख छाटण्याचे काम पद्धतशीरपणे हायकमांड तर्फे केले जात आहे. मोदी-शाह जोडीला माणूस उपयुक्त वाटत नसेल तर बाजूला सारण्याचे त्यांची पद्धत आहे. याकडेही विजय वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले. हिंदुत्व हा विचार आहे. त्याला धर्माशी जोडण्याचा प्रयत्न होऊ नाही. लोकशाहीमध्ये हिंदू, मुस्लिम, दलित असा भेद करता येणार नाही. शिवसेना जर मुस्लिम उमेदवार देत असेल तर त्यात काही वावगे नाही, ते लोकशाहीला मानतात, संविधानाला म्हणतात असा त्याचा अर्थ होतो असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com