Maharashtra Political News : पूर्व विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे (Rasmi Barve) यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. राज्य सरकारच्या न्याय व विशेष साहाय विभागाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बर्वे यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. या निर्णयामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला पराभवाची भीती असल्यामुळेच विजयी होणाऱ्या काँग्रेस उमेदवाराचा आतापासून छळ सुरू केल्याचा आरोप केला आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे पारडे जड आहे. त्यामुळेच त्यांच्या विरोधात साम, दाम, दंड, भेद सूत्राचा वापर भाजपने सुरू केला आहे. लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सरकारी यंत्रणांचे निःपक्ष वागणे अपेक्षित असताना विरोधकांचे खच्चीकरणाचे काम केले जात आहे. यातूनच रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र समितीने रद्द केल्याचा आरोप वडेट्टीवार (VIjay Wadettiwar) यांनी केला.
कायद्यानुसार 17 फेब्रुवारी 2020 ला रश्मी बर्वे यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले होते. त्यामुळे जात पडताळणी समितीला हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार नाही. समितीने अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन हा निकाल दिला आहे. लोकशाही मार्गाने, जनतेच्या दरबारात जाऊन निवडणूक लढणाऱ्या रश्मी बर्वे यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे या समितीवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही वडेट्टीवारांनी केली आहे.
नवनीत राणा (Navneet Rana) यांचे जातवैधता प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केले होते. सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित राहून पाच वर्षे खासदारकी पदावर राहिल्या. आता त्यांना भाजपने उमेदवारी दिली. आता काही झाले तरी काँग्रेस लढत राहणार. या समितीच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.