Vijay Wadettiwar : शासनाने काढलेला जीआर अनुकंपावर अन्याय करणारा

Government Order : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Vijay Wadettiwar : शासनाने काढला नवीन जीआर अनुकंपावर अन्याय करणारा आहे. प्रतीक्षा यादीत असताना 2005 नंतर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या संदर्भात कुठलाही उल्लेख यात नाही. सरकारच्या जीआरमध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा. जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जीआरमध्ये डावलण्यात आल आहे. त्यामुळे आता पेन्शनधारकांची लढाई नव्याने लढावी लागणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकार बनवाबनवी करीत कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहे. काँग्रेस सत्तेत आली तर महाराष्ट्रात इतर राज्यांप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल, अशी ग्वाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

कापूस कांदा आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी सरकारची मस्ती उतरविल्याशिवाय राहणार नाही. दिल्लीतील शेतकऱ्यांवर गोळीबार केला जात आहे. शेतकऱ्यांना गोळ्या घालणारे सरकार अत्याचारी आहे. इतिहासात पहिल्यांदा असा प्रकार पाहात आहोत. अन्नदात्याचे श्राप सरकारला लागतील. हे सरकार नालायक आहे. मुजोर आहे. मतदारच सरकार संपल्याविशिवाय राहणार नाही. टोमॅटो दाखवून डब्यात कांदा निर्यात केला जात आहे. ही वेळ शेतकऱ्यांवर आणली जात आहे. एमएसपीच्या नावावर क्विंटलमागे लूट सुरू आहे. कापसातलावलेल्या जाचक अटींमुळे कापूस खरेदी सेंटरवरून ट्रक परत जात आहेत. शेतकरी नागवला जात असल्याचा संताप वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांचा साफ उद्ध्वस्त करण्याचे काम हे त्रिपुरा भाजप सरकार करीत आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदार सरकारला त्यांची औकात दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar News : 'राष्ट्रवादी अजित पवारांची झाली, अन् अजितदादा..' ; वडेट्टीवारांनी लगावला टोला!

शरद पवारांसारखा नेता उदयापासून अस्तापर्यंत सोबत होते. त्यांना हे देव मानत होते. परंतु ईडीची कृपा अशी झाली की सर्वकाही त्यांच्या बाजूला वळले. मोदी भविष्यातही अशाच पद्धतीने वागतील. मोदी शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणतील. दहशतवादी म्हणतील. ते शेतकऱ्यांना काहीही म्हणू शकतात. शेतकऱ्यांना न्याय देण्याची भावना नसल्याने ते आंदोलन संपविण्याचे काम करीत आहेत. असे नेते आपल्याला मिळाले, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. ज्यांच्या भरोशावर जगत आहे. त्या शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. उद्योगपतींचे चोचले पुरविले जात आहेत, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

मराठा आरक्षणबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, डॉ. बबनराव तायवाडे बोलले ते खरे आहे. अशा पद्धतीची भाषा करण्याची हिंमत कोणाचीही कशी होते. मुजोरीची भाषा करणारा व्यक्ती कायद्याचा बाप आहे का? कायदा सगळ्यांसाठी समान आहे. कोणी हुकूमशाह नाही. कोणी कोणाविरुद्ध बोलू नये याचे भान ठेवावे, असेही वडेट्टीवार म्हणाले. राज्यात आमदार गोळीबार करीत आहेत. कायदा व सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. राज्यात दर तासाला तीन बलात्कार आणि दिवसाला सहा खून होत आहेत. तीन पक्षांच्या स्पर्धेमध्ये राज्याला अधोगतीकडे नेले जात आहे. मताच्या राजकारणासाठी धार्मिक भाषा केली जात आहे. असाच प्रकार सुरू राहणार आहे. अशी भाषा बोलली नाही तर मतं कशी मिळतील अशी धास्ती त्यांना आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar : देशात एकच समीकरण शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com