Vijay Wadettiwar : वडेट्टीवार नेमके कोणत्या राज्याचे? भाजप नेत्याने थेट पत्ताचं सांगितला

Parinay Phuke On Vijay Wadettiwar Assembly Election : काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांना घेरण्यासाठी ते नेमके कुठले असा प्रश्न उपस्थित करून नव्या वादाला तोंड फोडले जात आहे.
Parinay Phuke | Vijay Wadettiwar
Parinay Phuke | Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांना घेरण्यासाठी ते नेमके कुठले असा प्रश्न उपस्थित करून नव्या वादाला तोंड फोडले जात आहे.

मध्यंतरी ते अल्पसंख्य असल्याचा आरोप काँग्रेसच्या एक नेत्याने केला होता. आता भाजपचे नेते आणि आमदार परिणय फुके यांनी ते मूळचे तेलंगनातील असल्याचे सांगितले आहे. त्यांना ब्रम्हपुरीतून परत आपल्या गावी पाठवण्याचे आवाहन केले. विजय वडेट्टीवार आक्रमकपणे भूमिका मांडतात. भाजपच्या नेत्यांना थेट अंगावर घेतात. मोदींपासून तर फडणवीस यांच्यावर जाहीर टीका करतात. मात्र त्यांच्या विरोधात भाजपमधून (BJP) कोणी फारसे बोलताना दिसत नाही.

Parinay Phuke | Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar : भाजपने मध्य प्रदेशमध्ये 'लाडकी'चे पैसे दिले नाहीत; कर्नाटकमध्ये जावे अन् तोंड स्वच्छ करावं

फुके यांनी मात्र वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या मूळ मुद्यांवरच घाव घातला आहे. आता वडेट्टीवार हे त्यांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लगले आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बम्हपुरीचे आमदार अल्पसंख्यक आहे असे सांगून परिवर्तन करण्याचे आवाहन कुणबी समाजाच्या मेळाव्यात केले होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता.

Parinay Phuke | Vijay Wadettiwar
Sanjay Raut : '26 तारखेनंतर मोदी सत्तेत नसतील'; संजय राऊतांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

परिणय फुके (Parinay Phuke) यांच्यावर भाजपने एकूण 15 मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. ते म्हणाले,' साकोलीच्या जनतेने पाच वर्षांपासून आमदार बघितला नाही. नाना पटोले राज्यभर फिरत आहेत. साकोलीच्या जनतेला ते गृहित धरतात. त्यामुळे यावेळी त्यांना साकोलीचीच जनता धडा शिकवणार आहे.

नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी काहीच केले नाही. एकही उद्योग आणला नाही. केवळ विरोधकांवर टीका करणे एवढचे त्यांना येते, असेही फुके म्हणाले. 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेचा विरोधक वेगळा अर्थ काढत आहे. यावरून महायुतीमध्ये (Mahayuti) कुठलेही मतभेद नाहीत. काही संभ्रमसुद्धा नाही नसल्याचे परिणय फुके यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com