Pune News, 15 Nov : शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे भाजपसह महायुतीवर आपल्या भाषणातून आणि पत्रकार परिषदेतून सडकून टीका करत असतात. शिवाय महायुतीच्या सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेंच्या शिवसेनेवरही ते हल्लाबोल करत असतात.
ईडीच्या भीतीने अजित पवार आणि शिंदे गटातील लोक भाजपसोबत गेल्याचा पुनरुच्चार ते सतत करत असतात अशातच शुक्रवारी (ता.15) पुण्यातील (Pune) शिवाजीनगर येथील सभेतून त्यांनी महायुती सरकारसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे.
शिवाजीनगर येथील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार दत्ता बहिरट यांच्या प्रचार सभेत राऊतांनी महायुतीवर टीका करताना राज्यात 'मविआ'चं सरकार आल्यानंतर नरेंद्र मोदी सत्तेत नसतील असा विश्वास व्यक्त केला आहे. राऊत म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यंदा विधानसभेवर जातील. महाराष्ट्रात परिवर्तन करायचं आहे, आता ही घाण महाराष्ट्रात नको.
कोयता गँगचा बंदोबस्त एकदा करा. 2 मुलं गाडीखाली चिरडली जातात आणि आरोपीला वाचवायला आख्खं सरकार कामाला लागतं. 23 तारखेनंतर मोदी-शहांना महाराष्ट्र गुजरातमध्ये विलीन करायचा आहे. काल शिवाजी पार्कमधील मोदींच्या सभेला 5 हजार लोक देखील न्हवते आणि आम्ही लाखांच्या सभा घेतो.
नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. महाराष्ट्राला कंगाल करायची सुपारी त्यांनी घेतली आहे. महाराष्ट्रातील नेते मोदी-शहांचे बूट चाटत आहेत. प्रफुल्ल पटेल, भावना गवळी, एकनाथ शिंदे सगळ्यांवर केंद्रीय यंत्रणा कारवाई केल्यामुळे ते घाबरून पळून गेले. आम्हीही तुरूंगात गेलो पण घाबरलो नाही", अशा शब्दात त्यांनी महायुती आणि भाजपवर हल्लाबोल राऊतांनी केला.
तसंच यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सत्तेत आल्यास मोदी सत्तेत राहणार नाहीत असा दावा केला. ते म्हणाले, "आम्ही 26 तारखेला सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी सत्तेत नसतील. महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणायचे आहेत. महाराष्ट्रला गद्दारीचा शिक्का लागलाय तो आपल्याला कायमचा पुसायचा आहे. भारतीय जनता पक्षाला मुळापासून उकडून फेकायचं आहे. घाबरू नका आला अंगावर तर घेऊ शिंगावर, आमचं आख्खं आयुष्य मारामाऱ्यातच गेलं आहे." असं म्हणत त्यांनी भाजपवर घणाघात केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.