Sanjay Raut Vs Vikas Thackeray : 'संजय राऊत बालिश.. मी कच्चा खेळाडू नाही..'; विकास ठाकरेंचा सडेतोड पलटवार

Vidarbh Congress Politics : संजय राऊतांना विदर्भ काय आहे माहीत नाही. नागपूर शहराबाबत पुरेशी माहिती नाही. नागपूरकरांच्या मनात काय चालले आहे, याचा अंदाज नाही. त्यांना नागपुरात किती वेळा काँग्रेस आली हे माहिती नसेल.
Sanjay Raut, Vikas Thackeray
Sanjay Raut, Vikas Thackeray Sarkarnama

Nagpur Political News : नागपुरातून नितीन गडकरींना हरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. त्यातून फडणवीसांनी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंना रसद पुरवल्याचा खळबळजनक दावा महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी केला आहे. राऊतांचा हा दावा काँग्रेसच्या ठाकरेंच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे.

संजय राऊत बालिश असून मी कुणाच्या रसदीवर निवडणूक लढायला कच्चा खेळाडू नाही, असा पलटवार ठाकरेंनी केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना ठाकरेंनी राऊतांना सडेतोड शब्दांत समज दिली आहे. यातून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Sanjay Raut Vs Vikas Thackeray

विकास ठाकरे म्हणाले, संजय राऊतांना Sanjay Raut विदर्भ काय आहे माहीत नाही. नागपूर शहराबाबत पुरेशी माहिती नाही. नागपूरकरांच्या मनात काय चालले आहे, याचा अंदाज नाही. त्यांना नागपुरात किती वेळा काँग्रेस आली हे माहिती नसेल. त्यामुळेच ते बालिशपणाचे विधाने करत आहेत. मी काही कच्चा खेळाडू नाही. राजकारणात 1985 पासून असून 1997 नंतर निवडणुका लढतो आहे. येथील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये माझे नेटवर्क आहे. निवडणुकीत पक्षाचे सर्व नेते एकत्र होते. जनतेने मला निवडून आणण्यासाठीच प्रतिसाद दिल्याने मी जिंकणार आहे, असा दावाही ठाकरेंनी केला.

राऊतांनी पुरावे देऊन कुणी रसद पुरवल्याचे स्पष्ट करावे. वायफळ बडबड करू नये. गडकरी आणि त्यांचे काय प्रेम आहे, हे माहिती नाही. त्यांनी निवडणुकीच्या आधीही त्यांची स्तुती केली होती. त्यामुळेच मी कुणालाही नागपुरात प्रचाराला बोलावले नाही. नागपुरात काँग्रेस सक्षम आहे. आता राऊतांनी आपले तिकडचे पाहावे, इकडे त्यांनी लक्ष घालू नये. त्यांचे जे काही भाजपशी दुखणे ते त्यांनी तिकडेच निपटावे, असे खडेबोलही विकास ठाकरेंनी Vikas Thackeray राऊतांनी सुनावले आहेत.

Sanjay Raut, Vikas Thackeray
Sambhajinagar Lok Sabha Constituency : काठावर पास झालेले आमदार सावे, जयस्वाल लोकसभेला मताधिक्य कसे मिळवून देणार?

आम्ही महाविकास आघाडीची बंधने पाळत असून शांत आहोत. नाहीतर राऊतांविरोधात आम्हालाही खूप काही बोलता येते. त्यांना आपल्या विरोधातील उमेदवाराची स्तुती करायची होती तर ते आघाडीसोबत का आलेत? त्यांनी तिकडे दुसरा पक्ष काढून गडकरींसोबतच आघाडी करायला हवी होती. आघाडीत असल्याने राऊतांनी बोलताना तारतम्य बाळगायला हवे. आरएसएसच्या RSS हेडक्वार्टरमध्ये आम्ही ताकद लावून झगडतो आहे. मात्र आघाडीतील एक घटक पक्ष अशा पद्धतीने असे बोलत असेल तर काँग्रेसने त्यांना समज द्यावा. याबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांना पत्र लिहणार असल्याचेही ठाकरेंनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपूरबाबत Nagpur त्यांना काहीही माहिती नाही.नागपुरात काँग्रेसचा कार्यकर्ता ताकदीने लढला. मी कुणाच्याही रसदीवर निवडणूक लढवायला भिकार नाही. ते जे काही बोलले त्याबाबत त्यांना पत्र लिहून जाब विचारणार आहे. वेळ आली तर न्यायालयात जाणार आहे. मला कुणी रसद पुरवली त्याचे त्यांनी पुरावे द्यावेत. तुम्हाला भाजपमध्ये भांडणे लावायचा धंदा दिला आहे का? तुम्हाला नेमके काय करायचे आहे, हे तरी स्पष्ट करा. त्यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही तर जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशाराही ठाकरेंनी दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sanjay Raut, Vikas Thackeray
OBC V/S Maratha : मनोज जरांगेच्या आंदोलनावर ओबीसी नेते सावध; सरकारला दिला इशारा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com