Nagpur Politics : शिवसेनेत महिलांची स्थिती अत्यंत मजबूत आहे. विदर्भात सध्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा दौरा सुरू आहे. स्त्रियांचे जेवढे लक्ष घरात असते तेवढेच प्रेम त्यांचे शिवसेनेवरही आहे. त्यामुळे महिला जागृत आहेत. त्यांच्याशी बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी विदर्भाचा दौरा करीत असल्याचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले.
नागपूर येथे स्त्री संवाद यात्रेच्यानिमित्ताने आल्या असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, आम्ही या संवाद यात्रेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार आहोत. रामटेक लोकसभा मतदारसंघात कोणालाही आव्हान देण्याची काही गरज नाही. येथे जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. जनतेने आमचे आवाहन स्वीकारले आहे. त्याच्या मनात एक ज्वाला भडकत आहे. ती विझू न देता जागृत ठेवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार स्त्री संवाद यात्रा घेऊन आलो आहोत.
पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचे आदेश सर्वोच्च असतात. रश्मी ठाकरे या आमच्याशी वहिनी म्हणून बोलतात. त्या राजकारणात फारशा ‘इन्व्हॉल्व्ह’ नसतात. कोणाला कोणते पद आणि कोणती जागा द्यायची, हा अधिकार पक्षप्रमुखांचा आहे. महिला म्हणून अधिकार मिळतील की नाही, असे वाटण्याचे कोणतेही कारण शिवसेनेत नाही. प्रत्येक शिवसैनिक पक्षाच्या मुळाशी काम करीत आहे. त्यामुळे आम्हाला रश्मी ठाकरे यांच्याकडून कानमंत्र देण्याची गरज नाही. पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ती पार पडणार आहे, असे त्या म्हणाल्या.
महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. आता शिवसेनेकडून विदर्भ दौऱ्याला सुरुवात झाली आहे. त्यात रामटेक विधानसभा मतदारसंघ, सावनेर, काटोल आणि नागपूर यांचा समावेश आहे. महिलांशी संवाद साधत प्रश्न समजून घेण्यात येत आहेत. आम्ही संवाद साधायला आलो आहोत, असेही पेडणेकर यांनी नमूद केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी देण्यात येईल. कोणता उमेदवार किती उजवा आणि डावा आहे, हे लोकांना समजावून सांगणे जास्त गरजेचे आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे. आता समीकरण काय तयार होत आहे, याची सगळीच कल्पना नाही. पण महाविकास आघाडी सत्तेत येणार हे नक्की आहे. वाटाघाटीनंतर परत एकदा दौरा सुरू राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.
आपण सर्व हिंदू आहोत. आपल्या सगळ्यांचे दैवत श्रीराम आहेत. प्रत्येक व्यक्ती योग-प्राणायाम करतो तर पहिले शिकवले ते की श्वासात श्रीराम आहे. आमंत्रणातून देऊन कुणाला तरी वर चढवायचे आणि कुणाचा अपमान करायचा, हा प्रकार सुरू आहे. आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही अयोध्येला जाऊ. देव कुठेही कधीही जात नाही. ते आपल्या जागेवरच असतात. त्यामुळे आम्हाला दिखावा करण्याची गरज नाही, असेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.