नागपूरची प्रभाग रचना जाहीर, आता लक्ष आरक्षणाकडे; भाजप-कॉंग्रेसला समान संधी...

नागपूर (Nagpur) महापालिकेने (Municipal Corporation) ५२ प्रभागांची रचना जाहीर केली असून आता सर्वांचे लक्ष आरक्षणाकडे (Reservation) लागले आहे.
Nagpur City
Nagpur CitySarkarnama
Published on
Updated on

नागपूर : सुमारे दोन महिन्यांपासून प्रभाग रचनेची प्रतीक्षा करीत असलेल्या इच्छुक उमेदवारांची उत्सुकता आज संपली. नागपूर (Nagpur) महापालिकेने (Municipal Corporation) ५२ प्रभागांची रचना जाहीर केली असून आता सर्वांचे लक्ष आरक्षणाकडे (Reservation) लागले आहे. प्रभाग रचनेसोबत जातीनिहाय लोकसंख्याही सोबत सादर करण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षित होणाऱ्या प्रभागांचा अंदाज आला आहे. एकूणच नव्या प्रभाग रचनेवरून सत्ताधारी भाजप (BJP) आणि काँग्रेसलाही (Congress) विजयाची समान संधी उपलब्ध राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

महापालिकेची मागील निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्यात आली होती. महाविकास आघाडीने यात बदल केला आहे. आता तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यात येणार आहे. एका प्रभागात जास्तीत जास्त ५१ हजार तर कमितकमी ४२ हजार लोकसंख्या राहणार आहे. शहरात एकूण ५२ प्रभाग असून नगरसेवकांची संख्या १५६ इतकी राहणार आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा सात नगरसेवकांची भर पडणार आहे.

भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने प्रभाग रचनेत मोठे फेरबदल होतील, अशी शंका वर्तविली जात होती. मात्र जुन्या प्रभागांची फारशी तोडफोड झाल्याचे दिसून येत नाही. याउलट अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्यांक समाजाच्या वस्त्यांना एकत्र करण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे अल्पसंख्यांक नगरसेवकांची संख्या यंदाच्या निवडणुकीत वाढणार असल्याचे दिसून येते. प्रभागाची रचना करताना २०११च्या लोकसंख्येचा आधार घेण्यात आला आहे. त्यानुसार १२ प्रभागांमध्ये ३१ जागा एससी, ८ प्रभागांमध्ये १२ जागा एसटी राखीव राहतील. एकूण १५६ पैकी ७८ जागा महिलांसाठी राखीव राहणार आहे. शहरातील एकूण १७ प्रभागांमध्ये महिला आरक्षण वगळता सर्वांसाठी खुले राहणार आहे. ओबीसी आराक्षणाचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आरक्षणाच्या सोडतीपूर्वी निकाल जाहीर झाला तर यात फेरबदल होण्याची शक्यता आहे.

Nagpur City
नागपूर, पुण्यात जो धक्का बसला तो टाळण्यासाठी भाजपची आतापासूनच पावले..

महापौर सर्वाधिक सुरक्षित..

विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी यांचा प्रभाग भाजपसाठी एकदम सुरक्षित झाला आहे. त्यांच्या प्रभागाच्या सभोवताल असलेल्या मुस्लिम वस्त्या त्यांच्या जुन्या प्रभागातून वगळण्यात आल्या आहेत. नव्या रचनेत मुस्लिम वस्त्या वेगळ्या प्रभागात जवळपास एकत्रित केल्या आहेत. त्यामुळे येथील भाजपचे टेंशन जवळपास संपले आहे.

आभा पांडे यांना टेंशन..

चारच्या प्रभागात शहरातून एकमेव निवडून आलेल्या ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांच्या प्रभागाचे जवळपास दोन तुकडे झाले आहेत. त्यामुळे त्यांचे टेंशन वाढले आहे. अलीकडेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्या प्रदेश सरचिटणीस आहेत. राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदीसुद्धा त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीत असल्याने यावेळी त्यांना निवडणूक लढताना दोन उमेदवारांची सोबत राहणार हा त्यांच्यासाठी दिलासा ठरू शकतो.

सर्वात मोठा प्रभाग २५..

शहरातील सर्वात मोठा प्रभाग २५ क्रमांकाचा राहणार आहे. येथील एकूण लोकसंख्या ५१ हजार ३३६ इतकी आहे. यात ५ हजार ८१७, अनुसूचित जमातीचे ११ हजार ८२८ मते यात आहेत. या प्रभागात इतवारी, कुंभारपुरा, जुनी मंगळवारी, आयचित मंदिर, भुतेश्वर नगर, गंगाबाई घाट या वस्त्यांचा समावेश आहे.

सर्वात लहान प्रभाग ४७

सर्वात लहान प्रभाग ४७ क्रमांकाचा आहे. येथील लोकसंख्या ४२ हजार ८३३ लोकसंख्या, असुसूचित जाती ३ हजार ४१० व अनुसूचित जमातीची एक हजार ९१७ इतकी लोकसंख्या आहे. या प्रभागात जंबुदीपनगर, महालक्ष्मीनगर, अयोध्यानगर, बीडीठेप, न्यू सुभेदारनगर या प्रमुख वस्त्यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com