Ramdas Tadas, Amar Kale
Ramdas Tadas, Amar KaleSarkaranama

Amar Kale : विदर्भातील एकमेव मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार !

Wardha Loksabha Election : हर्षवर्धन देशमुख यांच्या नकारानंतर विदर्भात वर्धा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काँग्रेसच्या माजी आमदाराला थेट राष्ट्रवादीचे तिकीट देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या मतदारसंघात आता महाविकास आघाडीला भाजपविरोधात जोरदार रणशिंग फुंकावे लागणार आहे.
Published on

Loksabha Election 2024 : वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी आमदार अमर काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे. हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. यंदा महाविकास आघाडीचा घटक पक्षाकडे मतदारसंघ गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला येथे संधी मिळाली आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी देण्याची तयारी पक्षाने केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील इतर उमेदवारांची चर्चा आता थांबण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे हे आता राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी फुंकण्यास तयार झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या उमेदवारींवर वरिष्ठांनी शिक्कामोर्तब करत त्यांना निवडणूक कामाला लागण्याचा आदेश दिला आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ramdas Tadas, Amar Kale
Arvind Kejriwal Arrested : केजरीवालांचं मुख्यमंत्री पद जाणार? जनहित याचिका दाखल...

काँग्रेस नेत्यांमध्ये या मतदारसंघात कमालीची उदासीनता आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अमर काळे यांना उमेदवारी देत नवचैतन्य निर्माण केले आहे. महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांनी प्रचार सुरू केला. त्यांच्या प्रचाराचा व निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्धा येथे धावता दौरादेखील केला. या आढावा बैठकीत भाजप नेत्यांना एकसंध ठेवत लोकसभा निवडणुकीचे कार्य वेगाने करण्याच्या सूचना द्वयींनी दिल्या. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणाला जातो याची चर्चा रंगली होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे हा मतदारसंघ गेला असून, काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे हे राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे पुढील काळात ते जोमाने प्रचारालादेखील लागतील. महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांचा संभ्रम यातून दूर होणार आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघ हा परंपरागत काँग्रेसकडे होता. पण, या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला. इतक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस थांबली नाही तर त्यांनी आर्वीचे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना गळाला लावत त्यांना उमेदवारी देण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर अमर काळे यांनी नुकतीच सपत्नीक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेता शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती होती. या सर्व प्रक्रियेत जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याची माहिती मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील एकमेव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माजी आमदार अमर काळे यांची उमेदवारी निश्चित केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे अमर काळे विरोधात भाजपचे रामदास तडस असा सामना रंगणार असून, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक नीतेश कराळे मास्तर यांना अपक्ष लढावे लागते काय, असा प्रश्न या निमित्त चर्चिला जात आहे. विदर्भातील एकमेव मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने दावा केल्याने या ठिकाणी उमेदवार विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेस , शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांना कसून प्रयत्न करावा लागणार आहे.

R

Ramdas Tadas, Amar Kale
Mumbai North Central : बाॅलिवूडच्या हिरोईनचा रील नाही, रियल सामना रंगणार; स्वराविरोधात पूनम की माधुरी ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com