शिंदे -फडणवीस जोडी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवेल...

आज शिवसैनिकांपेक्षा Shiv sainik राष्ट्रवादी NCP व काँग्रेसवाले Congress त्यांना जवळचे वाटत असतील तर हा भ्रम कधीतरीच दूर होईल. शिवसेना व पक्षातील सर्वांचे आशिर्वाद शिंदे Eknath shinde साहेबांच्या सोबत राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Eknath Shinde, Devendra Fadanvis
Eknath Shinde, Devendra Fadanvissarkarnama
Published on
Updated on

मुंबई : देवेंद्र फडणवीस हे मंत्रीमंडळात सहभागी होण्याने एक मजबूती मिळाली असून त्यांच्या अनुभवाचा आम्हाला उपयोग करून घेता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आत्महत्या मुक्त महाराष्ट्र बनवायचा आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात सुखाचे क्षण आणण्यासाठी आर्थिकदृष्ट्या त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. त्यांच्या शेतीला पाणी देणे, पिके टिकविणे, त्याला दर देणे या गोष्टी केल्या जातील, असे शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

मुंबईत दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील सहभागाचा आम्हाला फायदाच होणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, मराठवाडा, विदर्भात आत्महत्या होत असतील तर महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी त्यांच्याबद्दल सहानभुती बाळगतो. पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांपुढे पर्यायी उत्पन्न आहे. तो आधार आम्ही त्यांना देऊ शकतो का, याविषयी चर्चा होते.

Eknath Shinde, Devendra Fadanvis
एकनाथ शिंदेंना काढलेली नोटीस बेकायदेशीर... दीपक केसरकर

उद्धवसाहेबांविषयी आदर आहे. पण तो भावनिक प्रश्न आहे. कायदेशीर लढाई लढावी लागणार असून ते आमचा हक्क असून पुढचा लढा हा महाराष्ट्रातील विकासाचा लढा असेल. देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रीमडळात सामील होण्याने एक मजबूती मिळाली आहे. त्यांची माहिती, नॉलेज आणि त्यांच्या अनुभवाचा उपयोग करता येईल. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करताना कोणतेही राजकारण येणार नाही. आता हिंदूत्ववादी पक्ष म्हणून भाजपसोबत आमचे नाते राहिल.

Eknath Shinde, Devendra Fadanvis
उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना `सीबीआय`चा मोठा दिलासा!

सत्तेत राहताना त्यांच्यावर टीका करणे व दुसरीकडे त्यांच्यासोबत सत्ते बसणे असे होणार नाही. शिवसेना भाजपची मने ही जुळलेली असून आम्ही अनेक वर्षांचे सहकारी आहोत. शिवसेना प्रमुख बाळसाहेबांच्या नेतृत्वाखाली २५ वर्षे व त्यांच्यानंतर उद्धव साहेबांसोबत उर्वरित कालावधीत आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी जबरदस्त लढाई केली. आज शिवसैनिकांपेक्षा राष्ट्रवादी व काँग्रेसवाले त्यांना जवळचे वाटत असतील तर हा भ्रम कधीतरीच दूर होईल. शिवसेना व पक्षातील सर्वांचे आशिर्वाद शिंदे साहेबांच्या सोबत राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com