Maharashtra Election News : 'स्थानिक'ची मतमोजणी नेमकी कोणामुळे पुढे ढकलली? फडणवीसांना नाराज करणाऱ्या निकालाचं 'भाजप कनेक्शन' समोर

Local Body Elections 2025 : नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीची मंगळवारी(ता.2 मतदान झालेल्या नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीची मतमोजणी तब्बल अडीच आठवडे पुढे ढकलण्यात आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा कोर्टाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
Municipal Election 2025
Municipal Election 2025 Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीची मंगळवारी(ता.2 मतदान झालेल्या नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीची मतमोजणी तब्बल अडीच आठवडे पुढे ढकलण्यात आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा कोर्टाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. विरोधकांचीसुद्धा या निर्णयाच्या विरोधात टिकाटिप्पणी सुरू आहे. अनेकांचा आरोपांचा रोख भाजपवर (BJP) आहे. यात आता मतमोजणी पुढे ढकलण्यासाठी याचिका दाखल करणारे कार्यकर्ते भाजपचेच असल्याचे समोर आले आहे. यावरून विरोधकांच्यावतीने भाजपला धारेवर धरले जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगरपालिका क्षेत्रातील सचिन ढोणे, वर्धा जिल्ह्यातील प्रदीप ठाकूर यांनी ही याचिका दाखल केली होती. हे दोघेही भाजपचे कार्यकर्ते आहेत. याशिवाय वर्धा जिल्ह्यातील देवळी नगर पारिला क्षेत्रातील परवेज नावाच्या व्यक्तीनेही याचिका दाखल केली होती. ते काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे.

निवडणूक आयोगाने (Election Commission) राज्यभरातील नगर पालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर कोला होता. त्यानुसार 2 डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी केली जाणार होती.

या दरम्यान काही उमेदवारांनी अपील दाखल केले होते. नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेल्या अपिलावर संबंधित नगर पालिकेची निवडणुकीच स्थगिती करण्यात आली आहे तर काही ठिकाणी प्रभागातील निवडणुकीवर स्थगिती देण्यात आली आहे. सर्व स्थगित नगरपालिका आणि नगर परिषदांमध्ये आता 20 डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे. त्यानंतरच एकत्रित मतमोजणी करण्याचे आदेश कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहे.

Municipal Election 2025
Local Body Election Results: 'स्थानिक'च्या निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्यामुळे उमेदवारांसह सरकारलाही मोठा फटका बसणार

राज्यातील प्रत्येक नगरपंचायत आणि नगरपरिषद स्वतंत्र मानून चालता येणार नाही. निवडणुकीचा निकाल प्रामाणिकपणे जाहीर करायचा झाल्यास तो एकाच दिवशी जाहीर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील होणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लगेच जाहीर करता येणार नाही, असा स्पष्ट आदेशच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

यात निवडणुकांचे एक्झिट पोल देखील जाहीर केल्या जाऊ नये असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान या निकालावर पुढील सुनावणी 10 डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आली असून राज्य निवडणूक आयोग आणि राज्य शासनाला नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com