Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

आमदार मुनगंटीवार का म्हणाले की, मी राजीनामा देईन आणि निवडणूक लढणार नाही !

हा छावा म्हणाला की, माझा जीव गेला तरी चालेल. पण मी धर्मांतर करणार नाही. त्यांनाही तेव्हा खुर्चीवर प्रेम करता आले असते, खुर्चीसाठी लाचार होता आले असते, असे आमदार मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

नागपूर : औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय काढला की, मंत्री अनिल परब केंद्राकडे जाण्याची भाषा करतात. या विषयावर तुम्हाला जर केंद्राची मदत लागत असेल, तर मी स्वतः तेथे मुक्काम करेल आणि केंद्राने अनुमती दिली नाही, तर राजीनामा देईन आणि आयुष्यात निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज केली.

औरंगाबादच्या (Aurangabad) नामकरणावर बोलताना ते म्हणाले, १० हजार कोटी वाघ एकीकडे आणि संभाजी महाराजांची (Sambhaji Maharaj) शक्ती एकीकडे, हे सर्वमान्य आहे. याबद्दल कुणाचं दुमत असण्याचे कारण नाही. आपण अनेक नाव बदलविली आहेत. विमानतळांची नावही आपण बदलवली आहे. मग खुद्द हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) घोषणा केलेली असतानाही हे सरकार ते करत का नाहीये? संभाजी महाराजांच्या डोळ्यांत गरम सळाखी टाकल्या केल्या, नखं उपटली गेली. चामडी सोलून काढली. तरी हा छावा म्हणाला की, मी धर्मांतर करणार नाही. मी धर्मवीर आहे, माझा जीव गेला तरी चालेल.

त्यांनाही तेव्हा खुर्चीवर प्रेम करता आले असते, खुर्चीसाठी लाचार होता आले असते. संभाजी राजांना औरंगजेबाने सांगितले होते की, माझ्या तीन अटी मान्य कर. त्यातली एक प्रमुख अट होती की, तुमचे सर्व किल्ले मला द्या. मी तुम्हाला दख्खनच्या प्रदेशाचा प्रमुख करेन. तेव्हा संभाजी राजे म्हणाले, अशा खुर्च्या मी आगीत भस्मसात करून टाकीन. या खुर्च्या, ही पदं आयुष्यभर नाहीत. पण औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर आज केले पाहिजे. हे आपण पहिल्यांदा करत नाहीये. यापूर्वी २०११ मध्ये ओरीसाचे नाव बदलवून उडीसा केले. पॉंडेचरीचे पुंडीचेरी केले, २०१५ मध्ये दिल्लीमध्ये औरंगजेब मार्ग होता, त्याचे नाव बदलवून एपीजे अब्दुल कलाम हे नाव दिलेच आहे.

Sudhir Mungantiwar
महानगरपालिका निवडणूक : मुनगंटीवार नागपूर, तर बावनकुळे चंद्रपूरचे प्रभारी…

छत्रपती संभाजी राजे महाराज यांचा आज पुण्यस्मरण करण्याचा दिवस आहे. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १९८८ मध्ये स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे २७ नगरसेवक निवडून आले, त्यावेळी विजयोत्सव साजरा करताना औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे, अशी घोषणा केली होती. यामध्ये राजकारण नाही, पक्षाची धोरणं नाही, या महाराष्ट्राचा, देशाभिमान इतिहास आहे. निवडणुका, एबी फॉर्म, आमदारकी गेली खड्ड्यात. यासंदर्भातला प्रस्ताव भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना होती, त्यांनी १३.०६ २०१६ ला दिला होता. ४ मार्च २०२० ला ही कार्यवाही पूर्ण झाली. आज आपला आदरांजली व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे आज सरकारने हा प्रस्ताव मान्य केला पाहिजे, असे आमदार मुनगंटीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com