Mahavikas Aghadi : इच्छुकांकडून पूर्व नागपूरचा हिशेब कोण घेणार?

Nagpur Mahavikas Aghadi News: पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघावर दावा सांगणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी लोकसभेच्या निवडणुकीत काय केले याचा हिशेब घेण्‍यात येणार आहे.
Maha Vikas Aghadi
Maha Vikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 22 June : पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघावर दावा सांगणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी लोकसभेच्या निवडणुकीत काय केले याचा हिशेब घेण्‍यात येणार आहे. अनेक दिग्गज नेते येथे आहेत. हा मतदारसंघ आपलाच असल्याचा ते दावा करतात.

असे असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वाधिक 80 हजारांचे मताधिक्य कसे मिळाले अशी विचारणा आता केली जात आहे. शिवाय यासंदर्भात विधानसभेच्या तिकीट वाटपाच्या वेळी विचारणा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी पूर्व नागपूरमधून (Nagpur) 5 वेळा निवडूण आले होते. नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत इतिहास घडवणारे आमदार ॲड. अभिजित वंजारी येथून लढले होते. ते आमदार असले तरी त्यांनी पूर्व नागपूरवरचा आपला दावा सोडलेला नाही. सतीश चतुर्वेदी यांचे समर्थक आणि मागील निवडणुकीत 80 हजार मते घेणारे पुरुषोत्तम हजारे हे पुन्हा संधीची वाट बघत आहे.

Maha Vikas Aghadi
Bjp News : विधानपरिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी; पाच जागांसाठी मागितली 35 जणांनी उमेदवारी

महायुती असल्याने शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. भाजपसोबत युती असताना शिवसेना (Shivsena) याच मतदारसंघातून लढत होती. आता सतीश चतुर्वेदी यांचे सुपुत्र, माजी आमदार तसेच नागपूर शहराचे संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांना येथून लढायचे आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकांमध्ये त्यांनी पूर्व नागपूरची मागणी केली आहे.

काँग्रेससोबत आघाडी असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पूर्व नागपूरवर दावा करण्यात आला होता. आता राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक दुनेश्वर पेठे हे पूर्वमधून लढण्याची तयारी करीत आहेत.

विधासभेच्या 2019 च्या निवडणुकीत आमदार कृष्णा खोपडे आणि काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे असा सामना रंगला होता. त्यापूर्वी खोपडे दोन वेळा निवडूण आले होते. सतीश चतुर्वेदी आणि अभिजित वंजारी या काँग्रेसच्या दिग्गजांना त्यांनी पराभूत केले होते. हजारे यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतर सहज निवडूण येऊ असा खोपडे यांचा अंदाज होता. एक लाखांनी आपण निवडूण येणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. प्रत्यक्षात ते 24 हजार मतांच्याच फरकांनी निवडूण आले. हजारे यांनी तब्बल 80 हजार मते घेऊन खोपडे यांचे आसन डळमळीत केले होते.

Maha Vikas Aghadi
Nana Patole News: लोकसभेनंतर नानांचा बदललाय बाणा..! म्हणाले, पवारसाहेबांनी एक पाऊल मागे घेतले असेल तर आम्ही...

आता महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना पूर्व नागपूरवर दावा सांगितला आहे. त्यापूर्वी त्यांना तसेच इच्छुक उमेदवारांना लोकसभेच्या निवडणुकीत काय केले याचे उत्तर द्यावे लागणार आहे. विकास ठाकरे यांनी सर्वच मतदारसंघातून गडकरी यांचे मताधिक्य घटवले. मात्र पूर्वेतील एकाही इच्छुकांना काँग्रेसचे मताधिक्य वाढवता आले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com