Winter Session | Deepak Kesarkar | Uddhav Thackeray
Winter Session | Deepak Kesarkar | Uddhav Thackeray Sarkarnama

Winter Session : सहा महिन्यांनी ठाकरे-केसरकर आमने-सामने; काय म्हणाले उद्धव ठाकरे...

Winter Session : उद्धव ठाकरे-केसरकरांमध्ये उडाली शाब्दिक चकमक!
Published on

Winter Session : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) हे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या दालनात आमने - सामने आले होते. ठाकरे आणि केसरकर यांच्यात काही सेकंद चर्चा झाल्याचीही माहिती मिळते. यावेळी दोघांनीही एकमेकांना प्रश्न केला व काही सेकंदांनी एकमेकांपासून दूर ही गेले. काही क्षणांसाठी झालेल्या या सामन्याची आता एकच चर्चा होताना दिसत आहे.

Winter Session | Deepak Kesarkar | Uddhav Thackeray
Aurangabad : ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेने उद्योगमंत्री सावंत यांच्या नावाने उकळले वीस लाख..

ठाकरे आणि केसरकरांची ही भेट अचानक झाली होती. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या दालनातून केसरकर बाहेर येत होते. त्याच वेळी ठाकरेहे दालनात प्रवेश करत होते. यावेळी भेट झाल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. "जे काही विधिमंडळात कामकाज चाललेली आहे. विधिमंडळाबाहेर शिंदे गटाचं कामकाज चालेलेलं आहे, ते योग्य होत नसून, यावर ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली.

Winter Session | Deepak Kesarkar | Uddhav Thackeray
Praful Patel : आता प्रफुल्ल पटेलांनीही दंड थोपटले, म्हणाले...

जे काही चाललं आहे ते योग्य नाही. शाखा ताब्यात घेणं, कार्यालय ताब्यात घेणं, हे शोभत नाही, असे ठाकरे केसरकरांना म्हणाले. याला उत्तर देताना केसकर म्हणाले की, आमच्यावर अजूनही नाराज आहात का? एवढे बोलून केसरकर निघाले. यानंतर ठाकरे ही उपसभापती दालनात गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com