Nagpur Winter Session : महिलेवर कार घातली, दानवेंनी मुख्यमंत्र्यांना घेरलं...

ambadas Danve : "मुख्यमंत्र्यांच्या घरापासून जवळ घडली घटना..."
Ambadas Danve, Eknath Shinde
Ambadas Danve, Eknath Shindesarkarnama

Nagpur : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एका अधिकाऱ्याच्या मुलाने प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न ठाणे शहरात घडली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. त्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. "मुख्यमंत्री यांच्या गावात घटना घडते. मुख्यमंत्र्यांच्या घरापासून घटना घडलेले ठिकाण लांब नाही. आपण कायदा सुव्यवस्थेच्या, महिलांना न्याय देण्याच्या गोष्टी शिकवणार मात्र, हे सरकार अन्याय करणाऱ्याला पाठीशी घालते." असा आरोप अंबादास दानवे (ambadas Danve) यांनी केला.

Ambadas Danve, Eknath Shinde
Nagpur Winter Session : पटोले मागणी करीत राहिले, पण उत्तर द्यायला मंत्रीच नव्हते!

पोलिसांच्या भुमिकेवर देखील दानवे यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. आपण पोलिस आयुक्तांपासून तपास अधिकाऱ्यांसोबत बोललो मात्र, सगळेच दबावात असल्याचे जाणवत होते. ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तो महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकारी अनिल गायकवाड यांचा मुलगा आहे. त्याच्या सोबत आणखी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, गुन्हा दाखल करताना जामीन मिळेल अशी कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अंबादास दानवे म्हणाले.

साधं काठीने मारलं तरी पोलिस तत्परतेने ३०७ चा गुन्हा दाखल करतात. मग, या प्रकरणात ३०७ चा गुन्हा दाखल न करता इतर कलमाअंतर्गत बेदारकपणे गाडी चालवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. जेणेकरून जामीन मिळेल. आणि खरचं कालचं आरोपींना जामीन मिळाला, असे सांगत फक्त 307 नाही तर, 376 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुलीच्या चरित्र्यहननाचा प्रयत्न केला जातो आहे. मुलगी मोठ्या मुश्कीलीने गुन्हा दाखल करण्यास तयार झाली. तर तिच्यावर देखील पोलिसांचा दबाव आला. पोलिस विशेषता एका महिला पोलिसानी मोठी माणसे आहेत. तुला गुन्हा मागे घेण्यास सांगतील, असे म्हटले. सरकार अन्याय करणाऱ्याला पाठीशी घातले, अशी टिका दानवे यांनी केली.

(Edited By Roshan More)

Ambadas Danve, Eknath Shinde
Parliament Winter Session : निलंबित खासदारांकडून उपराष्ट्रपतींची मिमिक्री; राहुल गांधींकडून व्हिडिओ शुटिंग

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com