Yavatmal: उसणवारीच्या पैशातून वाद विकोपाला; महिलेची चाकूने हत्या

Major Crime : शहरातील आठवडी बाजार परिसरातील घटना, दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद
Murder Spot at Yavatmal.
Murder Spot at Yavatmal.Sarkarnama
Published on
Updated on

Murder : उसणवारीच्या पैशांशी संबंधित कारणावरून झालेल्या वादात एका महिलेवर चाकू हल्ला करण्यात आला. ही धक्कादायक घटना यवतमाळ शहरातील आठवडी बाजार परिसरात घडली. गंभीर जखमी झालेल्या महिलेचा शनिवारी (ता. 23) उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सदाफ शेख शेख अकील (वय 30, रा. तारपुरा आठवडी बाजार, यवतमाळ) असे मृत महिलेचे नाव आहे. बेबी आनंद जोशी (वय 50) वर्ष आणि विशाल आनंद जोशी (वय 24 वर्ष, रा. तारपूर आठवडी बाजार, यवतमाळ) अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शेख अकील शेख जमाल (वय 40 वर्ष, रा. तारपुरा) यांनी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. शेख अकील शेख जमाल आणि त्याची पत्नी सदाफ शेख शेख अकील या दोघांनी शेजारी राहणाऱ्या बेबी जोशी यांच्याकडून व्यवसायाकरीता 30 हजार रूपये उसणे घेतले होते. त्यातील काही पैसे परत करण्यात आले होते. मात्र बेबी जोशी ही आणखी पैसे मागत होती.

Murder Spot at Yavatmal.
Yavatmal : सरकार विरोधात भूमिपुत्रांचा एल्गार; दिग्रस तालुक्यात केला रास्तारोको

शुक्रवारी सायंकाळी बेबी जोशी आणि तिचा मुलगा विशाल याने शेख अकील शेख जमाल यांच्या घरी जात त्यांच्या आईला पैशांच्या कारणावरून मारहाण केली. ही बाब फेरीचा व्यवसाय करून घरी आल्यावर शेख अकील शेख जमाल यांना कळली. शेख अकील शेख जमाल, त्यांची पत्नी सदाफ शेख शेख अकील, यांच्यासह दोन महिला आईला मारहाण का केली म्हणून बेबी जोशी यांच्या घरी गेले. यावेळी विशाल जोशी याने वाद घालत सदाफ शेख शेख अकील यांच्या पोटात चाकूने वार केला.

बेबी जोशी हिने शेख अकील शेख जमाल याला आणि सोबत असलेल्या दोन महिलांना बांबूने मारहाण केली. परिसरातील नगारिकांच्या मदतीने शेख अकील शेख जमाल याने गंभीर जखमी पत्नीला तातडीने शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. शनिवारी सायंकाळी जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खूनाची ही घटना पैशांच्या कारणावरून हत्येची ही घटना असली तरी हा वाद दोन घटकांमध्ये पसरू नये यासाठी तातडीने उपाय करण्यात आले आहे. आठवडी बाजार परिसरातील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. महिलेची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तीक्ष्ण हत्याराने महिलेच्या पोटात भोसकण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. प्रकरणाचा तपास सुरू आहे. ज्या दोघांनी हत्या केली, ते व्याजाने पैसे वाटत होते काय, याची माहिती घेण्यात येत आहे. असा व्यवहार ते करीत असल्यास त्यांच्याजवळ अधिकृत परवाना होता काय, याचा तपासही करण्यात येणार असल्याची माहिती यवतमाळ पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांनी दिली.

Edited by : Prasannaa Jakate

Murder Spot at Yavatmal.
Yavatmal : घाटंजी बाजार समितीत लिलाव बंद पाडण्याचा राजकीय डाव उधळला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com