
Tiwasa News : अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महिला व बाल कल्याण मंत्री असलेल्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना पराभवचा धक्का बसला आहे. त्यांना भाजप महायुतीचे राजेश वानखेडे यांनी पराभूत केले आहे. सुमारे 7 हजार 617 मतांनी ठाकूर पराभूत झाल्या आहेत. Maharashtra Election Assembly 2024 Result news
महायुतीचे उमेदवार राजेश वानखेडे आंना 91 हजार 702 तर ठाकूर यांना 88 हजार 501 मते पडली आहेत. तिवसा विधानसभा मतदारसंघात मोदी लाटेतही यशोमती ठाकूर यांनी राखून ठेवला होता. सलग तीनवेळा निवडून येऊन त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली होती.
मात्र, यावेळी त्यांना विजयाचा चौकार मारता आला नाही. राजेश वानखेडे हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. त्यांना उमेदवारी देऊन भाजपने योग्य निर्णय घेतला असल्याचे दिसून येते. तिवसा मतदारसंघात वानखेडे आणि ठाकूर यांच्यात थेट लढत झाली. ठाकूर यांना अँटी इन्कबंसी मारक भोवल्याचे बोलले जात आहे.
राज्याच्या माजी महिला व बाल कल्याणमंत्री यांनी आपला वडिलोपार्जित तिवसा मतदारसंघ राखून ठेवला होता. भाजपने त्यांना पराभूत करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले. त्यांच्या सख्या बहिणीला विरोधात उभे केले होते. मात्र, मोदी लाटेचाही त्यांना फटका बसला नाही. यावेळी यशोमती ठाकूर विरुद्ध विरुद्ध भाजप महायुतीचे राजेश वानखडे यांच्यात पुन्हा एकदा सामना रंगला होता.
यावेळी वानखेडे यांनी मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाची परतफेड केली आहे. विसाव्या फेरीअखेरीस वानखेडे 7 हजार 674 मतांनी आघाडीवर होते. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास आपण मंत्री होणार असे सांगून यशोमती ठाकूर यांनी मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.