Yashomati Thakur News : " यशोमती ठाकूरही भाजपच्या वाटेवर होत्या, पण..." ; 'या' महिला खासदाराचा खळबळजनक दावा

Congress Political News : '' आता कितीही आटापिटा केला, तरी अॅड. ठाकूर यांना पुन्हा मंत्री केले जाईल याची कोणतीही शाश्वती नाही...''
Yashomati Thakur, Congress
Yashomati Thakur, CongressSarkarnama
Published on
Updated on

Amravati : राज्यात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली. यामुळे राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता पुढचा नंबर काँग्रेसचा असल्याचेही बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच माजी मंत्री आणि राज्यातील काँग्रस ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण त्यांनी स्वत: खुलासा केल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा थांबल्या.

पण आता तिवसा मतदारसंघाच्या तीनदा आमदार राहिलेल्या, माजी मंत्री काँग्रेसचा अभ्यासू आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणार्या यशोमती ठाकूर देखील भाजपच्या वाटेवर होत्या असा खळबळजनक दावा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.

Yashomati Thakur, Congress
Nana Patole News : गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचे पाप भाजपने केले, नाना पटोलेंचा हल्लाबोल

अमरावतीत सध्या काँग्रेस आमदार अॅड. यशोमती ठाकूर(Yashomati Thakur) यांच्या नेतृत्वात काँग्रेसची जनसंवाद यात्रा सुरू आहे. या यात्रेवर खासदार नवनीत राणा यांनी टीका केली.याचवेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. खासदार राणा म्हणाल्या, सध्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला, त्यावेळी अॅड. यशोमती ठाकूरही त्यांच्यासोबत भाजपमध्ये येणार होत्या असा दावा खासदार राणा यांनी केला. त्यावेळी अॅड. ठाकूर यांना मंत्रिपद हवे होते. ते न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले, असेही त्यांनी सांगितले.

'' आता पुन्हा ठाकूरांना मंत्री केले जाणार नाही!"

अॅड. ठाकूर यांनी केवळ सत्ता भोगली, परंतु अमरावतीमधील तरुणाईसाठी काहीच केले नाही, अशी टीकाही खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी केली. आता कितीही आटापिटा केला, तरी अॅड. ठाकूर यांना पुन्हा मंत्री केले जाईल याची कोणतीही शाश्वती नाही अशी टिप्पणीही त्यांनी केली.

'' काही नेत्यांनी आमदार राणा यांच्याकडून 'कडक नोटा' घेतल्या...''

आमदार रवी राणा किंवा आपल्याला मंत्रिपद नको आहे. आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्र सरकारपुढे अमरावती जिल्ह्याच्या समस्या मांडतो. त्यामुळे सरकारने अमरावती जिल्ह्यासाठी हॉर्मोस कंपनी दिली. त्यासाठी आपले पती आमदार राणा व आपण स्वत: रक्ताचे पाणी केल्याचेही नवनीत राणा यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत काही नेत्यांनी आमदार राणा यांच्याकडून ‘कडक नोटा’घेतल्या. परंतु, प्रचार मात्र दुसऱ्यांचाच केला असे नमूद करत खासदार राणा यांनी अॅड. ठाकूर यांच्यावर टीका केली.

लोकसभा निवडणुकीत रवी राणाकडून कडक नोटा घेतल्या. रक्ताचे अश्रू काढण्याचं तुम्ही काम केलं आणि प्रचार दुसऱ्याचा केला, असं म्हणत खासदार राणा यांची नाव न घेता माजी मंत्री, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली आहे.

Yashomati Thakur, Congress
MLA Disqualification : शिंदे गट पात्र की अपात्र ? विधानसभा अध्यक्ष घेणार सुनावणी; ठाकरेंच्या बाजूने सरोदे लढवणार किल्ला

राणा नेमकं काय म्हणाल्या...?

खासदार नवनीत राणा काँग्रेस(Congress) च्या वरिष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, अनेक लोक आता जनसंवाद यात्रा करत आहेत. मला त्यांना विचारायचं आहे की, 33 महिन्यांचं तुमचं सरकार होतं. तेव्हा कुठं तुमची यात्रा होती सत्ता गेली म्हणून तुम्हाला आता जनसंवाद यात्रा आठवते. तुम्ही लोकांना नौटंकी म्हणतात, तुकडोजी महाराजांच्या जिल्ह्यात नौटंकी करणं तुम्हीच सोडा. महिलांचं नाव घेऊन मी उभी राहिली महिलांचा अपमान करण्यासाठी नाही अशी सडकून टीकाही त्यांनी यावेळी केली.

(Edited By Deepak Kulkarni)

Yashomati Thakur, Congress
Ajit Pawar On Fadnavis : अजितदादांचं मराठा आंदोलकांवरील 'लाठीचार्ज'वरून मोठं विधान; "...तरीदेखील फडणवीसांनी माफी मागितली!"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com