MLA Disqualification : शिंदे गट पात्र की अपात्र ? विधानसभा अध्यक्ष घेणार सुनावणी; ठाकरेंच्या बाजूने सरोदे लढवणार किल्ला

Rahul Narwekar News : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर १४ सप्टेंबरला सुनावणी घेणार आहेत.
Uddhav Thackeray, Rahul Narwekar, Eknath Shinde news
Uddhav Thackeray, Rahul Narwekar, Eknath Shinde newsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) १४ सप्टेंबरला सुनावणी घेणार आहेत. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने त्यांच्या आमदारांची बाजू वकील असिम सरोदे मांडणार आहेत. त्यांनी ठाकरे गटाच्या आमदारांचे वकील पत्र घेतले आहे.

या संदर्भात बोलताना असिम सरोदे म्हणाले, प्रत्येक आमदाराबाबतची कारवाई वैयक्तिक स्वरूपाची असेल. आमदारांना पुरावे सादर करण्याची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींंच्या घटनापीठाने जो निर्णय दिला आहे, तो उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बाजूने आहे. त्यामुळे आता फक्त निकालाची घोषणा करणे बाकी आहे, त्याची जबाबदारी अध्यक्षांवर आहे.

Uddhav Thackeray, Rahul Narwekar, Eknath Shinde news
Harshvardhan Jadhav In Antarwali : जरांगे मागताहेत ते आरक्षण टिकणारे नाही, हर्षवर्धन यांचा अंतरवालीत येत दावा...

अनैतिकता कायद्याच्या चौकटीत बसवण्याचं कारस्थान सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची गटनेता म्हणून करण्यात आलेली नियुक्ती तसेच भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती चुकीची आहे, असे सर्वोच्च न्यायालयानेच सांगितले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना संवैधानिक निर्णय द्यावा लागेल, असे सरोदे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी होणार आहे. तब्बल ३४ याचिकांवर विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेणार आहेत.

वादी व प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार आहे. संबंधित आमदारांना त्यावेळी बोलावले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयात तब्बल नऊ महिने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी झाली. त्यानंतर घटना पीठाने निर्णय देताना आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे दिले होते. त्यामुळे आता चार महिन्यांनंतर विधानसभा अध्यक्ष आमदारांची सुनावणी घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये सत्तासंघर्षाच्या प्रकरणातील सुनावणी सुरू असताना मतदारांच्या वतीने असिम सरोदे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती.

Edited by : Amol Jaybhaye

Uddhav Thackeray, Rahul Narwekar, Eknath Shinde news
Imtiaz Jaleel On Road pothole : इम्तियाज यांनी मंत्री कराडांना चंद्रावरून थेट रस्त्यावरील खड्ड्यांवर आणले..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com