Yavatmal District Bank News : महाविकास आघाडीतून शिंदे गट इन, तर उद्धव ठाकरे गट आउट !

Shivsena : शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी एक उपाध्यक्ष पद आहे.
Eknath Shinde and Uddhav Thackeray
Eknath Shinde and Uddhav ThackeraySarkarnama

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता आहे. मात्र, या महाविकास आघाडीत शिवसेना शिंदे गटाचा समावेश असून उद्धव ठाकरे गट बाजूला पडला आहे. त्यामुळे ही आघाडी आता चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. अध्यक्षपद काँग्रेसकडे असून शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी एक उपाध्यक्ष पद आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला. शिवसेनेचे दोन गट झाले. जिल्ह्यातील शिवसेना ही दोन गटांत विभागली गेली आहे.

पालकमंत्री संजय राठोड यांच्यासोबत जिल्हा मध्यवर्ती बँकेतील काही संचालक शिंदे गटात गेले आहे, तर काही संचालक ठाकरे गटासोबत आहेत. महाविकास आघाडी असतानाही जिल्हा मध्यवर्ती बँकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संचालकांना बाजूला ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात दोन स्वीकृत सदस्यांची निवड आज करण्यात आली.

या निवडीसाठी संचालक मंडळांची बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीत महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्या संचालकांना विश्‍वासात न घेता निर्णय घेण्यात आला. स्वीकृत सदस्यांच्या निवडीच्या निमित्ताने सहकारातील वास्तव पुढे आले आहे.

Eknath Shinde and Uddhav Thackeray
Digras APMC News : दोन संजयमध्ये रंगणार निवडणुकीचा सामना; होणार जबरदस्त टक्कर...

राज्याच्या राजकारणात तसेच सहकार क्षेत्रातील निवडणुकीतही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे गट, असा मुकाबला सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यात महाविकास आघाडीत शिंदे गट असून उद्धव ठाकरे गटांचे संचालक बाजूला आहे. या नव्या समीकरणाची चर्चा स्वीकृत सदस्यांच्या निवडीमुळे पुढे आली आहे.

आजच्या बैठकीत स्वीकृत सदस्य म्हणून शिवसेना शिंदे गटातून पालकमंत्री संजय राठोड यांचे काका मोहन राठोड आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून मनोज जयस्वाल यांची निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री संजय देशमुख आणि नेरचे स्नेहल भाकरे हे दोघे उद्धव ठाकरे गटाचे आहेत. आजच्या निवडीने सदस्यांमध्ये शिंदे गटाची एक जागा वाढली आहे.

Eknath Shinde and Uddhav Thackeray
APMC Election : हिंगणघाटातही भाजप-कॉंग्रेस साथ-साथ; मागील वेळचे मित्र आता एकमेकांविरोधात !

आजच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीमध्ये कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा विचार न करता शिंदे (Eknath Shinde) गटाच्या लोकांना साथ दिली आणि ठाकरे गटाला बाहेरचा रस्ता दाखवला. या बॅंकेत शिंदे गट आणि भाजपमध्ये फारशी जवळीक नाही. भाजपचे येथे एकच सदस्य अमन गावंडे आहेत. महाविकास आघाडी म्हणून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे गट, असे चित्र असायला हवे होते. पण कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिंदे गट, असे समीकरण जुळल्याचे आज बघायला मिळाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com