Police Action  :एक्ससाईज ने चक्क दारू विक्रेत्याविरुद्ध केली एमपीडीए कारवाई

Action against liquor seller : यवतमाळ जिल्ह्यातील पहिलीच कारवाई,आरोपीची बेड्या ठोकून तुरुंगात रवानगी   
Police Action  :एक्ससाईज ने चक्क दारू विक्रेत्याविरुद्ध केली एमपीडीए कारवाई
Published on
Updated on

 Yavatmal News :  यवतमाळमध्ये आतापर्यंत पोलिसांनी गुन्हेगाराविरुद्ध एमपीडिएची कारवाई केल्याचे आढळून येत होते. मात्र आता एक्ससाईज म्हणजेच दारुबंदी व अबकारी विभाग ही यामध्ये मागे राहिला नाही. अवैध्यरित्या हातभट्टी दारूचे गाळप करून विक्री करणाऱ्या कुख्यात आरोपीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या इतिहासातील ही पहिलीच कारवाई असल्याचे बोले जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाठवलेला प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ मंजूर करताच आरोपीला बेड्या ठोकून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.

अमर राजू दातार असे एमपीडीए अंतर्गत कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर आरोपीचा अवैध हातभट्टी दारू गाळप करून विक्री करण्याचा गेल्या अनेक वर्षापासून करीत होता. यापूर्वी ही त्याच्या हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त करून गुन्हेही नोंदविण्यात आले आहेत. मात्र, त्याने हातभट्टी दारू गाळप करून विक्री करणे सुरूच ठेवले होते. 

मानवी आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या हातभट्टी दारू विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयाच्या वतीने जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे एमपीडीए प्रस्ताव पाठविण्यात आला होता. जिल्हादंडाधिकारी डॉ. पकंज आशिया यांनी आदेश पारीत करताच अमर दातार याला अकोला कारागृहात स्थान बद्ध करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Police Action  :एक्ससाईज ने चक्क दारू विक्रेत्याविरुद्ध केली एमपीडीए कारवाई
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्यातील भाषणामधील महत्त्वाचे मुद्दे

काय आहे एमपीडीए कायदा?

महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिविटी) होय. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणार्‍या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.

अवैध दारू गाळप करणाऱ्यांवर महाराष्ट्र दारू बंदी कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येते . पण कायद्याच्या पळवाटा शोधून या आरोपींची लवकरच जमानत  होते आणि ते तुरुंगाबाहेर येतात . आणि ते पुन्हा आपला अवैध व्यवसाय सुरु करतात . एमपीडीए अंतर्गत कारवाई केल्याने कुठेतरी या असल्या गुन्हेगारांना जरब बसेल असा विश्वास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नीतेश शेंडे यांनी व्यक्त केला .

Police Action  :एक्ससाईज ने चक्क दारू विक्रेत्याविरुद्ध केली एमपीडीए कारवाई
Maharashtra Government : थर्टी फर्स्ट, न्यू इयर अन् रात्रभर दारू… शिंदेंना ठाकरेंच्या सैनिकांचे सवालच-सवाल

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नीतेश शेंडे यांच्या मार्गदर्शनात भरारी पथक निरीक्षक संतोष भटकर, दुय्यम निरीक्षक सी. टी. दरोडे,पी. आर. बाभूळकर,, ए.बी. पेंदोर, पी. जी. मसराम, एम.पी. शेंडे, ए. आर. बोथले, धर्मेंद्र त्रिपाठी, डी. ओ. कुटेमाटे, अजीज पठाण, संदीप दुधे, महेश खोब्रागडे, चिद्दरवार आदींनी केली.

(Edited by Sudesh Mitkar)

Police Action  :एक्ससाईज ने चक्क दारू विक्रेत्याविरुद्ध केली एमपीडीए कारवाई
Satara Politics : उदयनराजेंना भिडणारा शिवसेनेचा 'हा' नेता लोकसभा निवडणूक लढवणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com