Satara Politics : उदयनराजेंना भिडणारा शिवसेनेचा 'हा' नेता लोकसभा निवडणूक लढवणार?

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून शड्डू ठोकण्यास सुरुवात झाली आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Satara News : सातारा जिल्ह्यात महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्याकडून दावा केला गेला आहे. यामध्ये भाजपाकडून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आणि शिवसेना शिंदे गटाकडून पुरूषोत्तम जाधव इच्छुक आहेत. तर सातारा लोकसभेवर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दावा केला आहे. महाविकास आघाडीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडूनही दावा केला जात आहे. अशावेळी शिंदे गटाचे पुरूषोत्तम जाधव यांचे भावी खासदार बॅनर लागले आहेत.

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर पाहायला मिळाले होते. आता लोकसभेचा बिगुल लवकरच वाजणार असल्याने प्रत्येक पक्षाकडून लोकसभा मतदारसंघावर दावा केला जाऊ लागला आहे. तसेच आपल्या पक्षाचे इच्छुकांचे भावी खासदार असे बॅनर झळकल्याचे पाहायला मिळू लागले आहेत‌. सातारा जिल्ह्यातील शिवसेना (Shivsena) शिंदे गटाकडून खंडाळा तालुक्यातील पुरुषोत्तम जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार म्हणून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांकडून बॅनर लावल्याचे पाहायला मिळत आहे.

Eknath Shinde
Phaltan BJP News : तीस वर्षे सत्तास्थाने तुमच्याकडे; कामे करण्यास कोणी रोखले होते : रणजितसिंह निंबाळकरांचा टोला

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Election 2024) पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवाराकडून शड्डू ठोकण्यास सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये समावेश असलेल्या घटक पक्षांकडून लोकसभेला कोणत्या जिल्ह्यात, कोणता उमेदवार आणि कोणता पक्ष लढणार याविषयी आता उघडपणे चर्चा होऊ लागल्या आहेत.

सातारा जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाकडून सातारा लोकसभेच्या जागेवर दावा केला जात असून उमेदवार म्हणून पुरुषोत्तम जाधव इच्छुक आहेत. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार असे बॅनर सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी लागलेले पाहायला मिळत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

कोण आहेत पुरूषोत्तम जाधव?

पुरूषोत्तम जाधव यांनी 2009 मध्ये पुरुषोत्तम जाधव यांनी शिवसेनेतून प्रथम सातारा लोकसभेची निवडणूक छ. उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांच्या विरोधात लढली होती. त्यांना 2 लाख 35 हजार 68 मते मिळाली होती. 2014 मध्ये सातारा लोकसभेची जागा भाजपने रिपब्लिकन पक्ष्याला सोडली होती. त्यामुळे पुरूषोत्तम जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांना उदयनराजेंच्या विरोधात 1 लाख 55 हजार 937 मते मिळाली होती.

राज्यात 2014 साली भाजपाची सत्ता आल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते भाजप मधून सातारा लोकसभा लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटणीला आला. त्यामुळे त्यांनी भाजप सोडून पुन्हा शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित 2019 साली केला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार गेल्यावर महायुतीत शिवसेना शिंदे गटात सहभागी झाले असून ते सध्या जिल्हाप्रमुख आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Eknath Shinde
Parbhani BJP Politics : 'तयारीला लागा, सिग्नल मिळाला' बोर्डीकर समर्थकांचा दावा ; आता अजितदादा कोणता सिग्नल देणार ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com