Rajshree Patil : आयात उमेदवार आणि स्थानिक उमेदवार अशी रंगणार लढत !

Sanjay Deshmukh : वंचित उमेदवाराचे नामांकन रद्द करणे हे मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप वंचितने केला आहे. संजय देशमुख विरोधात राजश्री पाटील अशी थेट लढत यवतमाळ-वाशिम मतदार संघात होत आहे.
Sanjay Deshmukh, Rajshree Patil
Sanjay Deshmukh, Rajshree PatilSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal Washim Loksabha Election 2024 : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात आयात आणि स्थानिक या विषयावरुन निवडणुक रंगणार आहे. त्यात शिवसेना नेत्या भावना गवळी यांना डच्चु दिल्याने शिवसैनिक नेमके कोणत्या शिवसैनिक उमेदवाराचे काम करतात हे पाहण्यासारखे असेल. दोघात लढत असली तरी आयात आणि स्थानिक या मुद्यावर ही निवडणुक चर्चित राहील. दोन्ही कोट्याधीश उमेदवार ही निवडणुक जिंकण्यासाठी काय प्रयत्न करतात हे पाहण्यासारखे असेल. महायुती विरोधात महाविकास अशी थेट लढत या मतदार संघात आहे. पाच वेळा भावना गवळी खासदार होत्या त्या कोणाचा प्रचार करतात का हे पाहण्यासारखे ठरेल. वंचित उमेदवारांचे नामांकन रद्द करणे हे मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप वंचितने केला आहे.

निवडणुकीच्या रिंगणात अजूनही 20 उमेदवार आहेत. असे असले तरी मुख्य सामना महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच रंगणार आहे. आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्या उत्पन्नाचे स्रोत शेती, व्यवसाय व आमदाराचे निवृत्तिवेतन आहे. युतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचे उत्पन्नाचे स्रोत शेती, व्यवसाय व मानधन असल्याची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात दिली आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 38 उमेदवारांनी अर्ज दाखल झाले होते. छाननीत 18 नामांकन बाद झाले. निवडणुकीच्या रिंगणात अजूनही 20 उमेदवार आहेत. त्यापैकी महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार करोडपती असल्याचे शपथपत्रात दिसतात. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Deshmukh, Rajshree Patil
Baban Gholap News : बबन घोलपांचा प्रवेश शिंदे गटात, राजकीय लाभ मात्र अजित पवारांना होणार

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्याकडे तीन लाख 75 हजार रुपये रोख आहेत. चलसंपत्ती 1 कोटी 50 लाख व स्थावर संपत्ती 17 कोटी एवढी आहे. याशिवाय 490 ग्रॅम सोने आहे. स्कूल बस व दुचाकी आहे. देशमुखांकडे स्वतः चे चारचाकी वाहन नसून, त्यांच्यावर 2 कोटी 91 लाखांचे कर्ज आहे. देशमुख यांच्या उत्पन्नाचे स्रोत शेती, वेअर हाऊसमधून येणारे उत्पन्न, व्यवसाय व माजी आमदार निवृत्तिवेतन असल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे. त्यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी वैशाली देशमुख श्रीमंत आहेत. वैशाली देशमुख यांच्याकडे सहा लाख ५० हजार रुपये रोख आहेत. याशिवाय स्कूल बस, दुचाकी, दोन चारचाकी वाहन, ट्रॅक्टर आदी वाहने आहेत. शिवसेना उमेदवार राजश्री पाटीलही कोट्यधीश आहेत. स्थावर संपत्ती 1 कोटी 45 लाख रुपयांची आहे. त्यांच्याकडे 25 तोळे सोने असून, 11 लाखांचे कर्ज आहे. त्यांना गोदावरी अर्बन बँकेतून पाच लाख रुपये मानधन मिळते. याशिवाय दोन दुचाकी, दोन ट्रक, टोयोटा फॉर्म्युनर वाहन आहे. राजश्री पाटील यांचे उत्पनाचे साधन शेती, व्यवसाय व गोदावरी अर्बन बँकेतील मानधन असल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे. त्यांचे पती खासदार हेमंत पाटील यांच्याकडे रोख तीन लाख रुपये आहेत. त्यांच्याकडे टाटा सफारी, इनोव्हा वाहने व दहा तोळे सोने आहे. याशिवाय तळेगाव (ता. इगतपुरी) येथे बिगरशेती जमीन आहे. त्यांच्या उत्पनाचे साधन शेती, शेअर्स, ठेवी व खासदार वेतन असल्याचेही शपथपत्रात नमूद आहे. लोकसभा निवडणुकीत कशी रंगत येते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

वंचितने केली चौकशीची मागणी

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यामागे मोठे षडयंत्र आहे.अभिजित राठोड यांच्या अर्जात असलेल्या त्रुटी करीता छाननी आधी दिलेल्या नोटीस प्रमाणे अभिजित राठोड यांनी नव्याने प्रतिज्ञा लेख तयार करून सादर करून त्यांना दिलेले त्रुटी पूर्ण केल्या नंतर नव्याने त्रुटी काढून निवडणूक निर्णय अधिकारी पंकज आशिया ह्यांनी वंचित उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द केला आहे.विशेष म्हणजे त्रुटी पूर्ण झाल्या वर देखील ऐन वेळी छाननी मध्ये नव्याने त्रुटी काढून जाणीवपूर्वक अर्ज बाद करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी केला आहे.सदर प्रकरणी निवडणुक आयोगास तक्रार करून कार्यवाही करावी अशी मागणीही वंचित कडून करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणुक आयोगा कडे तक्रार करण्यात येत असून पंकज आशिया ह्यांना आलेले कॉल आणि अर्ज सादर करणे व छाननी दरम्यान ते कुणाचे संपर्कात होते, ह्यांचा कॉल डेटा काढून गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.

Sanjay Deshmukh, Rajshree Patil
Lok Sabha Election 2024 : माढ्यात राजकीय हालचालींना वेग; शहाजीबापूंना घाम फोडणाऱ्या डॉ. अनिकेत देशमुखांनी घेतली पवारांची भेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com