Youth Congress Politics Video : युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांवरील कारवाई संशयच्या भोवऱ्यात, कुणाल राऊतांवर गंभीर आरोप

RSS Mohan Bhagwat Nagpur Youth Congress office bearers dismissed : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात आंदोलन करताना गैरहजर असलेल्या काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
kunal raut
kunal raut sarkarnama
Published on
Updated on

Youth Congress Politics : युवक काँग्रेसच्या पाच डझन पदाधिकाऱ्यांना पदमुक्त केल्याने आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांचा पोरखेळ सुरू आहे. त्यांच्या निर्णयामुळे संघटनेची बदनामी होत असल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय तीन वेळा बदलण्यात आला होता. ज्या दिवशी आंदोलन ठरले होते त्या दिवशी प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत शहरात नव्हते. त्यामुळे आंदोलनासाठी दुसरा दिवस निवडण्यात आला. आधी सकाळी आंदोलन करण्याचे ठरले होते. मात्र नंतर वेळेत पुन्हा बदल करण्यात आला आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सायंकाळचा निरोप देण्यात आला.

kunal raut
Maharashtra Politics: बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनीच ठाकरेंचे 15 आमदार फूटणार; शिंदेंच्या माजी आमदाराचा दावा

त्यामुळे अनेक जणांनी मेसेज बघितले नाही, अनेकांना आंदोलनाची वेळ बदलल्याची कल्पनाच नव्हती. एवढेच नव्हे तर युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात राहतात. त्यांचे घर संघ मुख्यालयाजवळच आहे. त्यांनी विधानसभेची निवडणूकसुद्धा लढली आहे. मध्यच नव्हे तर शहरभर त्यांचे कार्यकर्ते आहेत. मात्र त्यांनाही आंदोलनाची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे आंदोलन फसले. केवळ ५० कार्यकर्तेच सहभागी झाले होते.

प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना हे अपेक्षितच होते. त्यांना युवक काँग्रेसमधून काही जणांना हटवायचेच होते. त्यांनीच यादी तयार करून राष्ट्रीय अध्यक्षांना दिली. नेमक्या त्याच लोकांवर कारवाई केली. यापूर्वीसुद्धा कुणाल राऊत यांनी अशाच पद्धतीने कारवाई केली होती. त्यांच्यावर गंडातर येण्याची शक्यता दिसतात नंतर त्यांनी आपलाचा आदेश मागे घेतला, असा आरोप पदमुक्त करण्यात आलेल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

नियमानुसार कारवाई केली नाही

काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. युवक काँग्रेस ही या पक्षाची प्रमुख शाखा आहे. कुठलाही निर्णय घ्यायचा असेल आणि कारवाई करायची असले तर मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमावली आहे. मात्र त्याचा विचार करण्यात आला नाही. कारवाई करण्यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावून, म्हणणे ऐकूण घ्यावे लागते. प्रदेशाध्यक्षांना साधा हा नियम माहीत नसावा हे खरे वाटत नाही. हेतुपूरस्सर कारवाई करायची असल्याचे त्यांनी पदमुक्त करण्याच आदेश काढला.

या त्यांच्या आदेशामुळे काँग्रेसची बदनामी होत आहे. वारंवार असे आदेश काढले जात असल्याने प्रदेशाध्यक्षांचे हसे होत असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पदमुक्त करण्यात आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांचे चिरंजीव केतन ठाकरे, माजी विरोधीपक्षनेते व आमदार विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार, माजी आमदार अशोक धवड यांचे चिरंजीव अभिषेक धवड यांचा समावेश आहे.

kunal raut
Dada Bhuse Politics: दादा भुसे यांनी घेतला अद्वय हिरे यांचा "इझी कॅच", हिरे सत्तेतून बेदखल!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com