जिल्हा परिषद पोटनिवडणूक : नागपुर तालुक्यात कॉंग्रेसचा दणदणीत विजय

राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार Minister Sunil Kedar यांच्या सावनेर विधानसभा मतदार संघात भाजपचा पूर्णपणे सफाया झाला. येथे महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व सहा उमेदवार विजयी झाले.
Nagpur ZP Elections results
Nagpur ZP Elections resultsSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत नागपूर तालुक्यात कॉंग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. गोधनी रेल्वे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या डोंगरगाव, दवलामेटी व बोखारा गणात कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले. पण थेट लढत कॉंग्रेस व भाजपमध्येच झाली त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेसने बाजी मारली.

राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर विधानसभा मतदार संघात भाजपचा पूर्णपणे सफाया झाला. येथे महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व सहा उमेदवार विजयी झाले. येथे भाजपला खातेही उघडता आले नाही. केदार यांनी ही निवडणूक पूर्णपणे आपल्या अंगावर घेतली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख या निवडणुकीत सहभागी नसल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार उघड्यावर पडल्यासारखे झाले होते. पण केदारांनी त्यांनाही पाठबळ दिले आणि रमेश बंग यांच्यासारख्या जुन्या नेत्यांच्या साथीने या निवडणुकीत विजय मिळविला.

गोधनी रेल्वे जिल्हा परिषद मतदारसंघात कॉंग्रेसच्या कुंदा राऊत विजयी झाल्या. त्यांनी भाजपचे विजय राऊत यांचा पराभव केला. कुंदा राऊत यांना ७१६१ मते मिळाली, तर विजय राऊत यांना ३८२९ मते मिळाली. पंचायत समितीमध्ये डोंगरगावमध्ये उज्वला रोशन खडसे, दवलामेटी सुलोचना ढोके आणि बोखारा पंचायत समिती गणात अपर्णा राऊत या कॉंग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळविला.

भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तरावरील एकाही नेत्याने या निवडणुकीत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग घेतला नाही. माजी ऊर्जामंत्री व भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या साथीने कडवी झुंज दिली. पण त्यामध्ये त्यांना फारसे यश आल्याचे आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार तरी दिसत नाही. नागपूर जिल्हयात मंत्री सुनील केदार आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातच लढत आहे, असे चित्र होते.

Nagpur ZP Elections results
उमेदवारांपेक्षा नेत्यांसाठी प्रतिष्ठेची आहे जिल्हा परिषद पोटनिवडणूक...

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे ही पोटनिवडणूक लागली होती. पण निवडणुकीत ओबीसीचा मुद्दा जाणवलाच नाही. सर्वच पक्षांनी ओबीसी उमेदवार दिल्याने ओबीसी विरुद्ध ओबीसी असाच संघर्ष बघायला मिळाला. राज्यात सत्तेत असल्याचा फायदा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाला. राष्ट्रवादी सुनील केदारांच्या छायेत असल्याचे चित्र बघायला मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com