ZP teacher suspension : शिक्षण विभागात मोठी खळबळ! ZP शिक्षक बदली प्रकरणात निलंबनाची कुऱ्हाड; बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर कारवाई

teachers suspended in ZP transfer controversy : ZP शिक्षक बदली प्रकरणात मोठी कारवाई; अधिकाऱ्यासह चार शिक्षकांवर निलंबन. शिक्षण विभागात मोठी खळबळ, सविस्तर वाचा.
ZP teacher suspension : शिक्षण विभागात मोठी खळबळ! ZP शिक्षक बदली प्रकरणात निलंबनाची कुऱ्हाड; बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर कारवाई
Published on
Updated on

जि.प. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमध्ये बनावट व दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेवून बदली मिळवणाऱ्या चार शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. त्यासोबतच बाळापूर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी सुद्धा शिक्षकांनी सादर केलेल्या बदली प्रस्तावांची सखोल पडताळणी न केल्याने त्यांना सुद्धा निलंबित करण्यात आले आहे.

याबाबतचा आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी १३ मार्च रोजी जारी केला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत शिक्षकांनी सन २०२५ मध्ये बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बदली घेतली होती. त्यामुळे याबाबत शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावर त्यांनी सातही पंचायत समित्यांचे गट शिक्षणाधिकारी यांना बदली घेतलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते.

ZP teacher suspension : शिक्षण विभागात मोठी खळबळ! ZP शिक्षक बदली प्रकरणात निलंबनाची कुऱ्हाड; बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर कारवाई
Vishal Patil : 'इससे भी बडा होगा!' सांगली जिल्हा परिषदेवर सत्ता आणताच खासदार विशाल पाटलांनी आखली पुढची रणनीती

तसेच तालुका स्तरावरुन संवर्ग एक मधून बनावट अंतराची पडताळणी करण्यात यावी, असे आदेशात नमूद केले होते. दरम्यान या प्रकरणी आता पाच जणांवर कारवाई झाली असून त्यात बाळापूर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी व इतर चार शिक्षकांचा समावेश आहे. याबाबत जुने शहरातील शिवनगरातील गणेश कुरई यांनी पाठपुरावा करत तक्रार केली होती.

यांच्यावर केली कारवाई

दिनेश दुतंडे विस्तार अधिकारी (शिक्षण) तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बाळापूर यांनी शिक्षक बदली करणाऱ्या शिक्षकांच्या प्रकरणाची तपासणी केली नाही. त्यामुळे अपात्र शिक्षक सुद्धा बदलीस पात्र ठरले. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. निलंबन काळामध्ये दिनेश दुतंडे यांचे मुख्यालय पंचायत समिती मूर्तिजापूर हे राहील.

हमीद हुसेन लियाकत हुसेन (सहाय्यक शिक्षक, सद्या कार्यरत जि.प.प्राथ. उर्दू शाळा वाडेगाव पंचायत समिती बाळापूर) यांनी दिव्यांग लहान भावाचे पालकत्व स्वीकारून विशेष संवर्ग भाग-१ मधून बदलीचा लाभ घेतला. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळामध्ये त्यांचे मुख्यालय जि.प. प्राथमिक शाळा सावरगाव पंचायत समिती हे राहील.

श्रीकांत त्र्यंबकराव वानखडे (सहाय्यक शिक्षक, जि.प. प्राथमिक मराठी शाळा अंत्री मलकापूर, बाळापूर) यांनी बदली पोर्टलवर विशेष संवर्ग भाग-१ मध्ये दिव्यांगत्वाबाबत तरतुदींचा भंग करुन खोटी व दिशाभुल करणारी माहिती भरून बदलीचा लाभ घेतला. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळामध्ये त्यांचे मुख्यालय जि.प. प्राथमिक शाळा जामठी-माठोडा पंचायत समिती मूर्तीजापूर राहील.

ZP teacher suspension : शिक्षण विभागात मोठी खळबळ! ZP शिक्षक बदली प्रकरणात निलंबनाची कुऱ्हाड; बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर कारवाई
RTE latest update : मोठी बातमी: आरटीई प्रवेशाचा मार्ग मोकळा; जाचक 'अट' अखेर रद्द; आता या तारखेपर्यंत भरू शकतात अर्ज

राजेंद्र पुंजाजी ताडे (सहाय्यक शिक्षक, जि.प. प्राथमिक मराठी शाळा निंभोरा पंचायत समिती अकोला) येथे कार्यरत असून त्यांनी जिल्हा अंतर्गत बदल्या करिता बदली पोर्टलवर विशेष संवर्ग भाग-२ मध्ये खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतली. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले.

निलंबन काळामध्ये राजेंद्र पुंजाजी ताडे यांचे मुख्यालय जि.प. प्राथमिक शाळा पंचायत समिती हे राहील. याव्यतिरिक्त ज्ञानेश्वर भोयर (सहाय्यक शिक्षक अकोट) यांना सुद्धा निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com