Vishal Patil : 'इससे भी बडा होगा!' सांगली जिल्हा परिषदेवर सत्ता आणताच खासदार विशाल पाटलांनी आखली पुढची रणनीती

Vishal Patil political plan Sangli district : सांगली जिल्हा परिषदेवर सत्ता मिळताच खासदार विशाल पाटील यांनी पुढील मोठ्या राजकीय रणनीतीचे संकेत दिले. जाणून घ्या सविस्तर माहिती.
Vishal Patil : 'इससे भी बडा होगा!' सांगली जिल्हा परिषदेवर सत्ता आणताच खासदार विशाल पाटलांनी आखली पुढची रणनीती
Published on
Updated on

सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या आज झालेल्या निवडणुकीत आपलं वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर खासदार विशाल पाटील यांनी आगामी राजकारणाबाबत मोठा इशारा देत पुढील रणनीती स्पष्ट केली आहे. येणाऱ्या काळात आणखी मोठं यश मिळवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

महापालिकेतील यशानंतर जिल्हा परिषदेतही अपेक्षेपेक्षा मोठं यश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणुकीदरम्यान विरोधकांकडून मोठे दावे केले गेले होते, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळू दिलं नाही, असं त्यांनी नमूद केलं.

Vishal Patil : 'इससे भी बडा होगा!' सांगली जिल्हा परिषदेवर सत्ता आणताच खासदार विशाल पाटलांनी आखली पुढची रणनीती
Shiv Sena withdrawal Sangli ZP news : सांगली जिल्हा परिषदेत शिवसेनेची तासाभरातच माघार : अध्यक्षपदासाठी पाटील विरुद्ध मासाळ तर उपाध्यक्षपदासाठी लाड-जाधव भिडणार!

निवडणुकीच्या काळात सत्तेचा गैरवापर झाला, विविध आमिषं दाखवली गेली आणि दबाव टाकण्याचे प्रयत्न झाले, असा आरोप त्यांनी केला. काही ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातूनही कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला, असंही त्यांनी सांगितलं. तरीही त्यांच्या गटातील सदस्य ठाम राहिले आणि शेवटी 34 चा आकडा गाठत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर विजय मिळवला.

या प्रक्रियेत काही वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, त्यानंतरही आपल्या सदस्यांनी एकजूट दाखवली, असं त्यांनी स्पष्ट केलं. पुढील काळात सभापती निवडीमध्ये हा आकडा आणखी वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते राजाराम बापू यांच्या कुटुंबातील संगीता पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. काही लोकांनी राजाराम बापूंविषयी केलेल्या वक्तव्यांना जनतेने योग्य उत्तर दिलं, असं ते म्हणाले. तसेच, स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांचे नातू कुटुंबातील सदस्य उपाध्यक्षपदी निवडून आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एक सकारात्मक संदेश गेला आहे, डॉ. पतंगराव कदम साहेब ज्यांचं खूप मोठं योगदान या सांगली जिल्ह्याच्या, या राज्याच्या विकासासाठी आहे, त्यांचा नातू आज या ठिकाणी उपाध्यक्ष झालेला आहे. हा वसंतदादा कुटुंबाला आणि सर्व सांगलीकरांना खूप मोठा अभिमान आणि आनंद आहे, असं त्यांनी सांगितलं.

Vishal Patil : 'इससे भी बडा होगा!' सांगली जिल्हा परिषदेवर सत्ता आणताच खासदार विशाल पाटलांनी आखली पुढची रणनीती
SSC Paper Leak Inside Story: 10वी पेपर चोरी प्रकरण: सीसीटीव्हीने उघडले गुपित! 'स्ट्राँग रूम'चं कुलूप तोडलं अन् ; पेपर चोरीची 'A to Z' इनसाईड स्टोरी

या विजयानंतर या निवडून आलेल्या लोकांच्या माध्यमातून सांगली पुन्हा एकदा अतिशय चांगली करायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. सांगली जिल्ह्यात नव्या अपेक्षा निर्माण झाल्या असून, विकासाच्या दृष्टीने काम करण्यावर भर दिला जाणार आहे. सर्व निवडून आलेल्या प्रतिनिधींना सोबत घेऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com