Vidhan Parishad Election News : विधान परिषदेच्या 'सभापति'पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच; तीनही पक्षांनी ठोकला दावा

Political News : दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीपदावर महायुतीमधील तीनही घटक पक्षाने दावा केला आहे.
Neelam Gorhe, Ramraje Nimbalkar, Ram shinde
Neelam Gorhe, Ramraje Nimbalkar, Ram shinde Sarkaranama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजप व महायुतीकडून आता ताकही फुंकून पिले जात आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्याची तयारी केली जात आहे. या निवडणुकीत काय होणार याची चिंता सतावत आहे. त्यातच आता दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीपदावर महायुतीमधील तीनही घटक पक्षाने दावा केला आहे.

विधान परिषदेच्या सभापती पदावरून महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (Shivsena) एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सभापती पदावर दावा केला आहे. त्यामुळे अधिवेशनकाळातच विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीबाबत राज्यपालांना पत्र जाणे अपेक्षित आहे. मात्र, महायुतीमध्ये यावर एकमत झाले नसल्याने गुरुवारपर्यंत याबाबतचे पत्र दिलेले नाही. (Vidhan Parishad Election News)

विधान परिषदेचे सभापतीपद 8 जुलै 2022 पासून रिक्त आहे. विधानपरिषद सभागृहात 78 पैकी 27 जागा रिक्त असून महायुतीकडे बहुमत आहे. त्यातच आता अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विरोधकांनी सभापतीपदाची निवडणूक घेण्याची मागणी लावून धरली होती. त्यामुळे आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मंगळवारी विधान परिषदेतील विरोधी पक्षाने राज्यपलांची भेट घेत निवडणूक घेण्याची मागणी केली होती. यामध्ये काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते.

आता विधानसभा निवडणुकीनंतरच पुढील अधिवेशन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आताच सभापती पदाची निवडणूक घेण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. येत्या काळात जर राज्यातील सत्ता गेली तर विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात कंट्रोल कायम राहवा, अशी रणनीती भाजपने आखली आहे. या पदासाठी भाजपमधील माजी मंत्री राम शिंदे, प्रविण दरेकर आणि निरंजन डावखरे यांची नावे चर्चेत आहेत.

Neelam Gorhe, Ramraje Nimbalkar, Ram shinde
Manoj jarange News : आमची मतं गोड वाटतात ! आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला न गेलेल्या 'मविआ'ला जरांगेंनी झापलं

विधान परिषदेतील पक्षीय बलाबल पहिले तर भाजपचे 19 सदस्य आहेत तर शिवसेना एकनाथ शिंदे गट तीन व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 4 सदस्य आहेत. या निवडणुकीत भाजपला महायुतीमधील कोणत्याच घटक पक्षाचा विरोध होणार नाही, असे वाटत होते. मात्र आता शिवसेनेने उपसभापती नीलम गोऱ्हे यांना ठाकरे गटातून इकडे घेताना सभापतिपदाचे आश्वासन दिले होते, असे सांगितले जात असून त्यामुळे या पदावर शिवसेनेकडून दावा केला आहे.

दुसरीकडे या पदावर विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचा सभापती पदाचा कार्यकाळ 2022 मध्ये संपला. त्यानंतर ते निवृत्त झाले. पण त्यावेळी एकसंध असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पुन्हा एकदा परिषदेवर पाठवले होते. त्यामुले अजित पवार गटाकडून हे पद पूर्वी आमच्याकडे होते. त्यामुळे आम्हालाच मिळाले पाहिजे असा दावा त्यांनी केला आहे.

विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे (NCP) अमोल मिटकरी, रामराजे नाईक निंबाळकर, सतीश चव्हाण, विक्रम काळे असे चार सदस्य आहेत. त्यामुळे आता या पदावरून महायुतीमधील तीनही पक्षांत रस्सीखेच पाहावयास मिळत आहे.

Neelam Gorhe, Ramraje Nimbalkar, Ram shinde
Congress News : काँग्रेसचा पर्वती विधानसभा मतदारसंघावर दावा, आबा बागुल यांनी थोपटले दंड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com