Aba Bagul
Aba Bagul Sarkarnama

Congress News : काँग्रेसचा पर्वती विधानसभा मतदारसंघावर दावा, आबा बागुल यांनी थोपटले दंड

Political News : काँग्रेसचे माजी महापौर आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी पुन्हा एकदा तयारी सुरु केली आहे.

Pune News : पुणे लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून हट्ट धरणारे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर थेट भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणारे. त्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी समजूत आल्यानंतर पुन्हा धंगेकरांच्या प्रचारात सक्रिय झालेले. काँग्रेसचे माजी महापौर आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी पुन्हा एकदा तयारी सुरु केली आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघ भाजपकडून काँग्रेसकडे (Congress) खेचून आणण्यासाठी आपणच सक्षम उमेदवार असल्याचा दावा बागुल यांनी केला आहे. यापूर्वी आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटून देखील वारंवार महाविकास आघाडीला या ठिकाणी पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसच्या वाट्याला देऊन त्यांची वर्णी लागावी यासाठी जोरदार मोर्चेबांधणी आबा बागुल यांनी केली आहे. (Congress News)

आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट एकत्रित सामोरे जाणार असल्याचे वरिष्ठ नेते सांगत आहेत. त्यामुळे पर्वती विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी दावा केला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp) वाट्याला आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. मात्र, त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागले होते. तरी देखील यावेळी अश्विनी कदम यांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. त्यासोबतच ठाकरे गटातील नेते देखील पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत.

यामुळे आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघावर दावा केला असला तरी आगामी काळात उमेदवारीसाठी महाविकास आघाडीमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ नेमका कोणाच्या वाटेला येतो, हे निश्चित झाल्यानंतरच मतदार संघातील चित्र स्पष्ट होणार आहे.

Aba Bagul
Ashok Chavan News : लोकसभेला नांदेडमध्ये पराभव झाल्याने अशोक चव्हाण अलर्टवर ; भोकर राखण्यासाठी सुरू केली तयारी...

महाविकास आघाडी बरोबरच महायुतीमध्ये देखील हा मतदारसंघ आपल्याच वाटायला यावा यासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देखील काही नेते या मतदारसंघातून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्यासोबतच भाजपमधील (Bjp) अन्य नेते देखील आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या विधानसभा मतदार संघामधील नेमकं चित्र कसं असेल हे जागावाटपानंतरच समोर येईल.

काय सांगतो पर्वती मतदारसंघाचा इतिहास

पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा भाजपच्या माधुरी मिसाळ यांनी विजय साकार केला आहे. 2009 साली माधुरी मिसाळ यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन तावरे निवडणूक रिंगणात उतरले होते. 2014 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली होती. त्यावेळी माधुरी मिसाळ यांच्या विरोधात काँग्रेसकडून अभय छाजेड तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुभाष जगताप निवडणूक रिंगणात होते.

2019 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने अश्विनी कदम यांना निवडणूक रिंगणात उतरवलं होत. त्यामुळे मागील तिन्ही निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला या मतदारसंघांमधून पराभव स्वीकारावा लागला आहे. तर 2009 पूर्वी सलग तीन टर्म या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार होते. शरद रणपिसे दोनदा तर रमेश बागवे एकदा या मतदारसंघांमधून काँग्रेसकडून निवडणूक लढून जिंकले आहेत. त्यामुळे यंदा हा मतदार संघ काँग्रेसला सुटावा अस काँग्रेस नेत्यांचे म्हणणं आहे.

Aba Bagul
Jalna Congress News : लोकसभेनंतर रावसाहेब दानवेंना काँग्रेस दुसरा धक्का देणार? विधानसभेचा प्लॅन ठरला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com