Vidhan Parishad Election News : मोठी बातमी ! काँग्रेसचा पुन्हा घात, नार्वेकर चमत्कार घडवू शकतात; शिंदे गटाच्या नेत्याचे मोठं विधान

Shivsena Politcs News : काँग्रेसकडे दोन उमेदवार निवडून येतील एवढा मताचा कोटा असूनही त्यांची काही मते फुटल्याने भाई जगताप निवडून आले तर हंडोरे पराभूत झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती या विधानपरिषद निवडणुकीत होणार का, अशी चर्चा रंगली आहे.
Vidhan Parishad Election 2024
Vidhan Parishad Election 2024Sarkarnama

Mumbai News : जून 2022 मध्ये शिवसेनेत फाटाफूट झाली. या बंड होण्याच्या आदल्या दिवशी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत निवडून येण्याची खात्री असलेले काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले.

काँग्रेसकडे (Congress) दोन उमेदवार निवडून येतील एवढा मताचा कोटा असूनही त्यांची काही मते फुटल्याने भाई जगताप निवडून आले तर हंडोरे पराभूत झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती या विधानपरिषद निवडणुकीत होणार का, अशी चर्चा रंगली आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (Vidhan Parishad Election News)

विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे विश्वासू शिलेदार मिलिंद नार्वेकर (Milind Narwekar) यांना उमेदवारी दिली. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत चुरस पाहावयास मिळत आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल, असे वाटत असताना आता विधानपरिषदेच्या 11 जागेसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे मतदान झाल्यास कोणत्या तरी एका उमेदवाराचा या निवडणुकीत पराभव होण्याची शक्यता आहे.

विधानसभेतील संख्याबळ पाहता विधानपरिषदेच्या 11 पैकी 8 जागांवर महायुतीचे उमेदवार सहज विजयी होऊ शकतात, तर एका जागेवरुन काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि शेकापच्या जयंत पाटील यांना निवडून आणण्याइतपत संख्याबळ मविआकडे आहे. मात्र, तिसऱ्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी मविआला इतर मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. याच जागेवरुन उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना मैदानात उतरवताना जुगार खेळला आहे.

Vidhan Parishad Election 2024
Milind Narwekar News : तुमची मते मिळाल्यानंतर अभिनंदन करा; मिलिंद नार्वेकरांचा मिटकरींना मिश्किल टोला

उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांचे सर्वपक्षात चांगले संबंध आहेत. त्यामुळे विधानपरिषदेत ते विजयी होऊ शकतील असे सर्वांना वाटते. विधानभवनात बोलताना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी वेगळीच शक्यता वर्तविली आहे. या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर चमत्कार करु शकतात. त्यांच्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांचा पराभव होऊ शकतो, असा सरनाईक यांचा अंदाज आहे.

मिलिंद नार्वेकर हे खेळाडू आहेत. मलाही त्यांना विधान परिषदेच्या सभागृहात बघायला आवडेल. आताच्या नार्वेकर यांच्या उमेदवारीने शेकापचे जयंत पाटील व काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांच्या उमेदवाराला धोका वाढला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या कोणत्या उमेदवाराला धोका होईल, असे वाटत नसल्याचे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

Vidhan Parishad Election 2024
Shivsena News : लोकसभेच्या पराभवानंतर संभाजीनगरात ठाकरे गटातून 'आउटगोइंग' सुरू !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com