Vidhan Parishad Election News : विधानपरिषदेच्या जागांवरून युती-आघाडीत चुरस; राज्यपाल नियुक्त 12 जागांचाही निर्णय होणार

Mahayuti News : लोकसभेला एकत्र असलेल्या महायुतीमधील तीन पक्षाने उमेदवार जाहीर करणे सुरू केले आहेत. त्यामुळे येत्या काळात या निवडणुकीच्या निमित्ताने महायुती व महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु आहे.
Vidhan Bhavan Mumbai,
Vidhan Bhavan Mumbai, Maharashtra Political Crisis Sarkarnama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीचा धुराळा बसला असला तरी निकाल येण्यास आठ दिवस शिल्लक असतानाच महायुतीमध्ये कलगीतुरा रंगला आहे. विधानपरिषदेचे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील महायुतीतील मित्रपक्षाने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभेला एकत्र असलेल्या महायुतीमधील तीन पक्षाने उमेदवार जाहीर करणे सुरू केले आहेत. त्यामुळे येत्या काळात या निवडणुकीच्या निमित्ताने महायुती व महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु आहे.

विधान परिषद निवडणुकीत महायुतीमधील (Mahayuti) चारही पक्ष स्वबळ आजमावण्याची शक्यता असल्याने चार जागेवरच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या चार जागावरून महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले असून येत्या काळात हे मतभेद विसरून एकत्र येणार की वेगळीच राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना एकनाथ शिंदे गट व मनसेने तयारी सुरु केली आहे. (Vidhan Parishad Election News )

Vidhan Bhavan Mumbai,
Ajit Pawar News : अंजली दमानियांच्या आरोपांना अजितदादांचे प्रत्युत्तर; म्हणाले, माझी नार्को टेस्टची तयारी पण...

राज्यात गेल्या दोन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे 9 जागा रिक्त आहेत. तर राज्यपाल नियुक्त 12 जागांचा तिढा अजूनही कायम आहे. त्यामुळे या सर्वच जागांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलेली पाहायला मिळत आहे. यंदाच वर्ष खऱ्या अर्थाने निवडणुकांचं वर्ष मानलं जातंय. लोकसभा निवडणुकीची रणधूमाळी सुरु असताना आता विधानपरिषदेची तयारी राजकीय पक्षानी सुरु केली आहे. निक स्वराज्य संस्थांच्या 9 जागा आणि राज्यपाल नियुक्त 12 जागा रिक्त आहे. त्यामुळे 78 जागांचं संख्याबळ 51 वरती येणार आहे.

विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाचे विलास पोतनीस, (Vilas Potnis) लोक भारतीचे कपिल पाटील, भाजपचे निरंजन डावखरे आणि अपक्ष किशोर दराडे हे निवृत्त होणार आहेत. जुलैमध्येही अनेक आमदार निवृत्त होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत निवडून जाणााऱ्या 9 जागाही रिक्त आहेत. दोन वर्षांपासुन 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांची निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे सर्व ठिकाणी प्रशासक पाहायला मिळत आहेत. विधानपरिषदेच्या नऊ जागाही रिक्त आहेत. विधानपरिषदेच्या या जागा रिक्त असतानाच जुलैमध्ये आणखी काही आमदारांच्या जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती प्रत्येकजण आपल्या पदरात जास्त जागा पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

विरोधकांमध्ये शिवसेना (shivsena) ठाकरे गटाकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. त्यामुळे आता जे काही आमदार निवडून येतील त्यावरती विरोधी पक्षनेता कोणाचा यावरती सुद्धा मोठी खडाजंगी होण्याची शक्यता आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडे सभापतीपद आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये ज्याची संख्या जास्त येईल, त्या ठिकाणीही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा काय निर्णय होतो याकडेसुद्धा सगळ्यांच लक्ष लागले असून त्यामुळेच महायुतीसह महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची रस्सीखेच सुरू आहे.

Vidhan Bhavan Mumbai,
Vidhan Parishad Election News : कोकण पदवीधरवरून महायुतीमध्ये पेच; मनसेच्या भूमिकेने संभ्रम

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com