Vidhan Parishad Election News : कोकण पदवीधरवरून महायुतीमध्ये पेच; मनसेच्या भूमिकेने संभ्रम

Bjp News : मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजीत पानसेंची उमेदवारी जाहीर करीत उडी घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात मनसे महायुतीमधून लढणार की ही निवडणूक स्वतंत्रपणे लढणार याची उत्सुकता सर्वाना लागली आहे.
abhijit panse, niranjan davkhare
abhijit panse, niranjan davkharesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात गेल्या तीन महिन्यापासून लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच सत्ताधारी व विरोधकाकडून एकमेकांवर केल्या जात असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीचा निकाल निकाल जाहीर होण्यापूर्वीच विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणूकीची घोषणा करण्यात आली.

या निवडणुकीत महाविकास आघडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाने दोन जागेवरील उमेदवार घोषित करीत बाजी मारली आहे. त्यातच सोमवारी मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजीत पानसेंची (Abhijeet Panse) उमेदवारी जाहीर करीत उडी घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात मनसे महायुतीमधून लढणार की ही निवडणूक स्वतंत्रपणे लढणार याची उत्सुकता सर्वाना लागली आहे. (Vidhan Parishad Election News)

abhijit panse, niranjan davkhare
NCP Ajit Pawar News : लोकसभेचा निकाल बाकी, तोच विधानसभेच्या जागावाटपावरुन अजितदादांचं दबावतंत्र?

विधानपरिषदेसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत. महायुती व महाविकास आघाडीची भूमिका काय असणार याची उत्सुकता लागली आहे. कोकण पदवीधर निवडणुकीत नक्की काय होणार? भाजपची (Bjp) रणनीती काय? यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहेत.

राज्यातील वातावरण कोकण पदवीधर मतदार संघावरून चांगलेच तापले आहे. सॊमवारी सकाळी मनसेनं अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर करीत मैदानात उडी घेतली आहे. तर कोकण पदवीधर मतदार संघात भाजपचे दोन वेळचे आमदार निरंजन डावखरे यांच्या उमेदवारीसाठी देखील भाजप आग्रही असल्याचे दिसते. डावखरे सध्या कोकणात प्रचार करीत आहेत. तर शिवसेना शिंदे गट देखील या जागेसाठी इच्छुक असल्याचे दिसते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील भाजप,मनसे आणि शिवसेना एकत्रित असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा केली आहे. त्यामुळे मनसेनं जाहीर केलेला उमेदवार मनसेचा की महायुतीचा? अशा देखील चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे महायतीमध्ये पेच निर्माण झाला आहे.

भाजपने कोकण पदवीधर मतदारसंघात आमदार निरंजन डावखरे (Nirnjan Davkhre) यांनी तयारी सुरु करण्यास सांगितली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे सचिव संजय मोरे हे कोकण पदवीधर निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याचेजाहीर केलं होतं.

abhijit panse, niranjan davkhare
Nanded Lok Sabha Constituency : नांदेडमध्ये वडील, मुलगा अन् जावई; 30-35 वर्ष एकाच कुटुंबाची सत्ता..

लोकसभा निवडणुका संपताच आता मनसे यांनी आगामी निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे मनसेच्या या उमेदवाराला महायुती पाठिंबा देणार की मनसे आणि महायुती आमने-सामने लढणार हे आता काहीच दिवसात स्पष्ट होणार आहे.

महाविकास आघाडीकडून (MVA) कोकण पदवीधर जागेसाठी ठाकरे गट आणि काँग्रेस दोघेही आग्रही आहेत. ठाकरे गटाकडून सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर रायगडमधील काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रवीण ठाकूर, काँग्रेसचे पक्ष समन्वयक रमेश कीर हे उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये मनसेला भाजप आणि महायुतीतील इतर पक्ष पाठिंबा देतात का ? हे पाहणे महत्वाच ठरणार आहे. मनसेच्या भूमिकेवर सर्व काही अवलंबून असणार आहे. त्यामुळे येत्या काळात या मतदारसंघांमध्ये तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

abhijit panse, niranjan davkhare
Sanjay Nirupam Vs MNS : उमेदवारीला मनसेचा तीव्र विरोध; निरुपम यांचं एक पाऊल मागे; म्हणाले...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com