Vidhan Parishad Election : विधान परिषदेत कोणाचा होणार गेम; 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात

Political News : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. कोणीच माघार घेतली नसल्याने येत्या 12 जुलैला निवडणूक होणार आहे.
Mahayuti-Mahavikas Aghadi
Mahayuti-Mahavikas Aghadi Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील आमदारातून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आता निवडणूक होणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी दुपारी तीन वाजता संपली. यावेळी कोणीच निवडणुकीच्या रिंगणातून कोणीच माघार घेतलेली नाही. त्यामुळे आता या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. कोणीच माघार घेतली नसल्याने येत्या 12 जुलैला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात महायतीकडून ९ जण तर महाविकास आघाडीकडून (MVA) तीन जण रिंगणात उतरले आहेत. पक्षीय बलाबल पाहिले तर महायुतीला 12 तर महाविकास आघाडीला सात मतांची आवश्यकता आहे. (Vidhan Parishad Election)

या निवडणूक रिंगणात भाजपचे (Bjp) पाच, शिवसेना शिंदे गटाचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन तर काँग्रेस एक, शेकाप एक व शिवसेना ठाकरे गटाचा एक उमेदवार रिंगणात आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना उमेदवारी दिली आहे . तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे दोघे निवडणूक लढणारा आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे.

Mahayuti-Mahavikas Aghadi
Shambhuraje Desai News: ठाण्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाईंना शोधा; मुरबाडमधील 'त्या' बॅनरची एकच चर्चा

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावर शेकापचे आमदार जयंत पाटील नशीब अजमावत आहेत, काँग्रेस (Congress) पक्षाकडून प्रज्ञा सातव निवडणूक लढणार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या क्षणी मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवल्याने विधानपरिषद निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

कोणाची विकेट पडणार ?

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांचे सर्वपक्षीय संबंध चांगले आहेत. त्यामुळे ते या निवडणुकीत कामाला येणार का, हे पाहावे लागणार आहे. तसे झाल्यास मिलिंद नार्वेकर सत्ताधारी महायुतीमधील कोणत्या पक्षाची मते फोडणार, हे पाहावे लागणार आहे. शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत होती. तोपर्यंत निवडणूक रिंगणातून कोणी तरी माघार घेईल असे वाटत होते. मात्र कोणीच माघार घेतलकी नसल्याने आता निवडणूक अटळ आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com