Vijay Wadettiwar : पूरस्थितीत मदत करा, पण भेदभाव करू नका; वडेट्टीवारांचा केंद्र आणि राज्य सरकारला सल्ला

Vijay Wadettiwar big demand to central and state government on flood situation : राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने मदतीसाठी पुढाकार घ्यावा. मदत करताना कोणताही भेदभाव करू नये, असा सल्ला विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे. या काळात केंद्र आणि राज्य सरकारने मदतीला उभे राहावे. सर्वसामान्यांपासून ते शेतकऱ्यांना मतदतीसाठी पुढाकार घ्यावा. परंतु मदत करताना कोणताही भेदभाव करू नये, असे आवाहन विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी केले.

मुंबईसह राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, राज्याच्या काही भागात पूरस्थिती उद्भवलीय. पुणे, रायगड, मुंबईमध्ये पूरस्थितीमुळे जनजीवन प्रभावीत झाले आहे. पावसामुळे काही भागात दरड कोसळल्या आहेत. काहींचे घरे वाहून गेली आहे. वाहने पाण्याखाली गेलीत. पावसाच्या धुमाकूळामुळे काही भागात दरड कोसळून, तर इतर अपघातामुळे काहींचा मृत्यू झाल्याच्या घटनासमोर येत आहे.

पुण्यातील वसाहतींमध्ये पाणी घुसले आहेत. मुंबईतील तलाव भरल्याने दरवाजे खोलण्यात आले आहेत. शहराला जोडणारे पूल देखील पाण्याखाली गेले आहेत. यामुळे राज्यात आपत्ती व्यवस्थापन दल अलर्ट मोडवर काम करताना दिसत आहे. महाराष्ट्राला पावसामुळे निर्माण झालेल्या पूर स्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने मदतीला उभे राहावे, अशी मागणी विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे.

Vijay Wadettiwar
Pune Rain : पुण्यासह सातारा, कोल्हापुरातील तुफान पावसाचे पडसाद लोकसभेत...

राज्यात मुंबईसह पूर्व विदर्भ, पुणे, कोल्हापूर, रायगड, पुणे (PUNE), अहमदनगर, रत्नागिरी, सातारा, सांगली या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी पूरस्थिती गंभीर झाली आहे. हवामान खात्याने पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. तसा पुढाकार सरकारने घ्यावा, यासाठी आम्ही देखील तयार आहोत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

आपत्ती व्यवस्थापन अलर्ट मोड काम करत असले, तरी नागरिकांनी देखील त्यांना सहकार्य करावे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले.

Vijay Wadettiwar
Supriya Sule: सुप्रिया सुळे प्रशासनावर 'बरसल्या'; पुण्यात पावसाचा हाहा:कार, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी...

ज्या भागात पूरस्थिती उद्भवली आहे, तेथी मोठे नुकसान झाले आहे. लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचे दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. त्यांचे मोठे नुकसान जाले आहे. गरीब कुटुंबांचे घरे पाण्यात गेली आहेत. संसार उपयोगी वस्तू पाण्यात वाहून गेल्या आहेत. महाराष्ट्रावर आलेल्या या संकटात केंद्र आणि राज्य सरकारने कोणताही भेदभाव न करता पुढे येऊन मदत करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. या पूरस्थितीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थिती शेतकऱ्यांना उभे करणे हे देखील आव्हान असणार आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहावे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com