Vijay Wadettiwar : 'ओबीसी नेत्यांची धरपकड, मनोज जरांगेंच्यासमोर सरकार गुडघ्यावर...', काँग्रेस नेत्याचा गंभीर दावा

Vijay Wadettiwar Manoj Jarange Patil OBC : राज्यात मनोज जरांगे यांच्या रुपाने पर्यायी व्यवस्था उभी राहिली आहे. मुख्यमंत्री नाही ही व्यवस्थाच सगळ चालवत असल्याचा दावा काँग्रेस नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
Vijay Wadettiwar speaks on Manoj Jarange Patil’s OBC agitation and Devendra Fadnavis’ role.
Vijay Wadettiwar speaks on Manoj Jarange Patil’s OBC agitation and Devendra Fadnavis’ role.sarkarnama
Published on
Updated on

Vijay Wadettiwar News : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन अधिक आक्रमक होत आहे. आंतरवाली सराटी जवळ आंदोलन करणाऱ्या ओबीसी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे.

ते म्हणाले, 'ओबीसींच्या नेत्यांनी आंदोलन केले होते त्यांची धरपकड झाली. आणि आता या राज्यात मुख्यमंत्री म्हणतायेत ते होत नाही, जरांगे म्हणतायेत ते होत आहे. जरांगे पाटलांच्या निमित्ताने राज्यात पर्यायी व्यवस्था उभी राहिली आहे. महायुतीचे सरकार त्यांच्या चरणावर गुडघे टेकून त्याचं सगळं म्हणण ऐकत आहे.महायुती सरकारची भूमिका ओबींना वाऱ्यावर सोडून जरांगे म्हणतील तेच करू अशी राहिली आहे.'

'मराठा आंदोलनकर्त्यांच्या दबावाखाली घाईघाईने जीआर काढून राज्यातील आरक्षण व्यवस्थाच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज एका समाजाच्या आरक्षणावर घाला घातला, तर उद्या दुसऱ्या समाजाचे आरक्षणही सुरक्षित राहणार नाही. आरक्षण हा कोणत्याही राजकीय दबावाचा विषय नाही; तो सामाजिक न्यायाचा आणि संविधानिक हक्कांचा विषय आहे.', असे देखील ते म्हणाले.

Vijay Wadettiwar speaks on Manoj Jarange Patil’s OBC agitation and Devendra Fadnavis’ role.
Manoj Jarange Demands : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू, सरकारचे टेन्शन वाढणाऱ्या 'या' आहेत 13 मागण्या!

आम्ही लढत राहू...

पुढे बोलताना ते म्हणाले, 'सरकारने कोणत्याही समाजावर अन्याय न करता, सर्व घटकांचे घटनात्मक हक्क सुरक्षित ठेवण्याची भूमिका घ्यावी. राजकीय दबावापुढे झुकून घेतलेले निर्णय भविष्यात महाराष्ट्रातील सामाजिक समतोलासाठी गंभीर परिणाम घडवू शकतात.ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी आम्ही ठामपणे लढत राहू.'

Vijay Wadettiwar speaks on Manoj Jarange Patil’s OBC agitation and Devendra Fadnavis’ role.
Tukaram Mundhe: शिवाजी जन्माला यावा, पण शेजारी!’ तुकाराम मुंढेंनी समाजाच्या मानसिकतेवरच बोट ठेवलं; पोस्ट व्हायरल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com