Wagle Vs Narke : दोन पुरोगामी विचारवंतांमध्ये जोरदार जुंपली; नरके म्हणाले, 'वागळे स्वत:ला शंकराचार्य..'

Nikhil wagle Vs Hari Narke : "केवळ जन्मावरुन ब्राह्मण म्हणून आरोप होणार असेल.."
Nikhil wagle Vs Hari Narke :
Nikhil wagle Vs Hari Narke : Sarkarnama
Published on
Updated on

Nikhil Wagle Vs Hari Narke : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे व ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांच्यातच जोरदार जुंपली आहे. केवळ आपण ब्राह्मण जन्माने म्हणून आपल्यावर आरोप होत असेल तर वेदना होतात, अशी खंत वागळे यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केली होती. तर यावर बोलताना हरि नरके यांनी वागळे स्वत:ला पुरोगाम्यांचे शंकराचार्य समजतात, अशा शब्दात टीका करत त्यांची खिल्ली उडवली होती.

निखिल वागळे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांच्यात मागील काही दिवसांपासून सोशल माध्यमावर वाद विवाद घडून येत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या जीवाला धोका आहे, अशी ही तक्रार वागळे यांनी केली होती. याबाबत एका सोशल पोस्टमध्ये वागळे म्हणतात, "४० वर्ष चळवळीत काम केल्यानंतर, प्रत्यक्ष जात, धर्म सोडल्यावर केवळ जन्मावरुन ब्राह्मण म्हणून आरोप होणार असेल तर वेदना होतात. पण आता राग येत नाही. कींव येते हा आरोप करणाऱ्यांची. कारण आरोप करणारे अजून जातीच्या डबक्यातच आहेत."

Nikhil wagle Vs Hari Narke :
Kharghar Heatstroke News : 'खारघर दुर्घटनेची अनेक कारणं, लोकं आप्पासाहेब यांना..' बावनकुळे म्हणाले...

आता या वादामध्ये सामाजिक कार्यकर्ते हरी नरके यांनी उडी घेतली आहे. नरके यांनी वागळेंना उत्तर दिले आहे. नरके आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, "निखिल वागळे उठसूठ दुसऱ्यांची जात काढतात. ते स्वत:ला पुरोगाम्यांचे शंकराचार्य समजतात. एकटा धुतल्या तांदळासारखा नी उरलेले सगळे जग, विशेषत: मागासवर्गीय नेते, कार्यकर्ते भ्रष्ट असल्याचे बेताल बडबडत असतात. वागळे हे निर्दय असून (२०१४ पासून कुंभकर्णी झोपेतल्या) गन्ना पगारे यांचे चाटुकार असलेले विश्र्वंभरी पत्रकार आहेत. वागळे हे कट्टर मंडल विरोधक. चॅनल हेड असताना बहुजन पत्रकारांची गळचेपी करणारे, जातीय कंपुशाही करणारे आणि दाखवायला आजूबाजूला एकदोन मागासवर्गीय ठेवणारे वागळे यांचे खरे रूप त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांना विचारा.

स्वत:वर बेतले की ते सहानुभूतीसाठी कांगावा सुरू करतात. जात सोडल्याचा दावा करताना, तसा इतरांचा अनुभव असायला हवा. काय बोलता यापेक्षा कसे वागता हे आम्ही बघणार. त्यात वागळे कायम टोकाला जाणारे, दिखाऊ, सुपारीबाज पत्रकारिता करणारे.

वागळेसाहेब, तुम्ही जर खरंच जात सोडली असेल तर मग जी सोडली आहे तीच्यावरून हिणवल्याच्या वेदना का बरे व्हाव्यात? तेव्हा जात सोडली आहे की कवटाळलेली आहे याचे एकदा आत्मपरीक्षण कराच मालक! म्हणजे जात सोडल्याची जाहिरात अहोरात्र करताकरता स्वत:ला तिचीच नशा चढल्याचे तुमच्या लक्षात येईल. तुमच्यातला तुच्छतावाद टिपिकल उच्चजातीय आहे. तुम्ही उठताबसता चळवळीतील सगळ्यांचे ऑडिट करता ना? मग तुमचेही होणारच की! पेरावे तसेच उगवते," असा हल्लाबोल नरकेंनी केला आहे.

Nikhil wagle Vs Hari Narke :
Ajit Pawar's Warning : 'भीमा पाटस'कडे १०० कोटींची थकबाकी; अजित पवारांचा कारवाईचा इशारा..

डॉ. अंजलीताई आंबेडकर यांनी दिलेला खालील सल्ला अतिशय मोलाचा आहे.

" आपण जेव्हा इतरांच्या वैचारिक प्रामाणिकता, सचोटी किंवा नैतिकतेवर संशय निर्माण करतो, तेव्हा आपल्यावर ही संशय घेणारे असतातच.आपण करतो ते गंभीर राजकीय विश्लेषण आणि इतरांनी आपले विश्लेषण केले तर ते ट्रोलिंग ही भूमिका स्वतः ला एक्सपोज करणारी असते."

वागळे यांना त्यागाची अनावर नशा चढलेली आहे. जात सोडल्याची फक्त दवंडी पिटणारे, प्रत्यक्षात विक्षिप्त, माजुरडे पत्रवीर आहेत निखिल वागळे. त्यांना मित्रांची किंवा चळवळीची कधीच किंमत नव्हती. उलट तेच त्यांचे सॉफ्ट टार्गेट होते, असते. त्यांच्यावर तुटून पडताना त्यांना कायमच चेव येतो. त्यांना 24×365 चळवळीतील दोस्तांवर संशय घेण्याचे भ्रमिष्टपण कधीतरी महागात पडणारच होते! बाजी उलटली की कांगावा सुरू हे नाटक आतातरी बंद करा वागळेसाहेब! जातीचे व्हिक्टिमकार्ड खेळणे हा तर फार केविलवाणा मार्ग झाला. मस्तवालपणा नडणारच, असेही नरके म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com