Walmik Karade : वाल्मिक कराडने केले 25 खून, 14 वर्षांच्या मुलालाही संपवलं, माजी पोलिस अधिकाऱ्याकडून धक्कादायक दावा

Walmik Karade Ranjit Kasale : वाल्मिक कराड हा विकृत असून तो जेलमधून आपल्या फोन करून धमकी देखील देत असल्याचा आरोप रणजित कासले याने केला आहे.
Valmik Karad Court News
Valmik Karad Court Newssarkarnama
Published on
Updated on

Walmik Karade News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडचे एकामागून एक कारनामे समोर येत आहेत. महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. महादेव मुंडेंच्या पत्नीने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती. ती मागणी मान्य करण्यात आली आहे. मात्र, बीड पोलिस दलातील निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले यांनी वाल्मिक कराडविषयी धक्कादायक दावा केला आहे.

वाल्मिक कराड याने एक दोन नव्हे तर तब्बल 25 खून केले असल्याचा दावा कासले यांनी केला. त्यासंदर्भात कासेल याने एका व्हिडिओ करत गंभीर आरोप केले आहेत. कराडने परळीत खून करून काही बाॅयलरमध्ये टाकले असतील तर काही तुकडे तुकडे करून नदीत, तलावात टाकले असतील असे देखील कासले म्हणाला आहे. एका 14 वर्षांच्या मुलाला देखील मारले आहे. मात्र, 302 देखील दाखल नाही. फोटो आहेत माझ्याकडे असा दावा देखील त्यांनी केला आहे.

वाल्मिक कराड हा विकृत असून तो जेलमधून आपल्या फोन करून धमकी देखील देत असल्याचा आरोप कासले याने व्हिडिओतून केला आहे. दरम्यान, कासले हा बीडच्या जेलमध्ये असताना त्याने वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात त्याने तक्रार देखील केली होती.

Valmik Karad Court News
Dattatray Bharne : थोरल्या साहेबांचा आदेश पण अजितदादांनी रिस्क घेतली... भरणेमामांनी ती निवडणूक लढवलीच!

रणजित कासलेचे निलंबन का?

रणजित कासले हा बीडच्या पोलिस विभागात पीएसआयपदी होता.त्याची नियुक्ती सायबर विभागात होती. मात्र, तो एका प्रकरणात पोलिस आयुक्तांना कुठलीही माहिती न देता गुजरात गेला. तेथे त्याने एका व्यापाऱ्याकडे तब्बल एक कोटीच्या खंडणीची मागणी केली. तसेच बंदूक दाखवून दहशत निर्माण केली. कासले खंडणी मागत असल्याचा व्हिडिओ देखील समोर आला होता. त्यानंतर पोलिस आयुक्तांना त्याचे निलंबन केले होते.

पंकज कुमावत यांची एसआयटी

महादेव मुंडे खून प्रकरणात त्यांच्या पत्नीने एसआयटी स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे. आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे महादेव मुंडे खून प्रकरणातील तपासाला गती मिळणार असून वाल्मिक कराड विरोधात फास आवळला जाणार असल्याची चर्चा आहे.

Valmik Karad Court News
Congress Politics : काँग्रेसमधील तीन बडे नेतेच राहुल गांधींच्या मतांशी असहमत; एका मुद्द्यावर पक्षात पडले दोन गट...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com