Karuna Sharma Big News: वाल्मिक कराडच्या सुपारीबाबतचा दावा खरा...; करुणा शर्मा- मुंडेंनी दिली 'ही' मोठी धक्कादायक माहिती

Walmik Karad Encounter Officer : बीडचे निलंबित पोलीस निरीक्षक रणजीत कासले यांच्या सोशल मिडियावरील व्हिडिओने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत कासले यांनी आपल्याला वाल्मीक कराडच्या एन्काॅऊटरची ऑफर देण्यात आली होती, असा दावा केला आहे.
karuna Sharma On Walmik Karad .jpg
karuna Sharma On Walmik Karad .jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर देण्यात आली होती. त्यासाठी मला 50 कोटी इतकी रक्कम मिळणार होती. पण आपण ती नाकारली असं विधान करत निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.यातच आता करुणा शर्मा -मुंडे (Karuna Sharma-Munde) यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

करुणा शर्मा मुंडे यांनी वाल्मिक कराड (Walmik Karad) एन्काऊंटर सुपारी प्रकरणावर भाष्य केलं आहे.यावेळी त्या म्हणाल्या, वाल्मिक कराडच्या सुपारीबाबतचा दावा खरा असू शकतो.त्याचं कारण म्हणजे धनंजय मुंडेंचे सगळे काळे कारनामे वाल्मिक कराडकडे आहेत,त्यामुळे हे होऊ शकतं, असं त्यांनी म्हटलं.

पाच पन्नास कोटी तर खूप छोटी रक्कम आहे. त्या लोकांकडे खूप पैसा आहे.तिथलं सगळं राजकारण पैशांच्या जोरावरच सुरू असून आज तुम्ही बघू शकता मोठ-मोठे कांड लोकांच्या समोर आलेले आहेत.वाल्मिक कराड हा तर एक मोहरा आहे असल्याचं खळबळजनक विधानही त्यांनी केलं आहे.

karuna Sharma On Walmik Karad .jpg
Girish Mahajan Vs Khadse: IAS महिला अधिकाऱ्याशी संबंधांचा आरोप जिव्हारी; मंत्री महाजनांनी खडसेंना खेचलं थेट कोर्टात; पहिलं पाऊलही टाकलं

अंजली दमानिया याबाबत दररोज नव-नवीन खुलासे करत आहेत.मात्र,अनेक प्रकरणं पैशांच्या जोरावर दाबली जात असल्याचा आरोपही करुणा मुंडे यांनी केला आहे.मात्र,रणजित कासले यांच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांची जर ही अवस्था असेल तर सामान्य लोकांची काय अवस्था असेल.त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही गृहमंत्रालयानं घेतली पाहिजे असं स्पष्ट मतही करुणा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.

करुणा शर्मा यांनी यावेळी अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यावरही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, फक्त सलमान खानलाच का धमक्या मिळत आहेत, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारला धमक्या का येत नाहीत? मला वाटतं, आगामी निवडणुकीत फक्त हिंदू, मुस्लिम आणि ओबीसींशिवाय दुसरा कोणताही मुद्दा त्यांच्याकडे नाही,पण आमचे देवेंद्र फडणवीससाहेब हे सलमान खानला सुरक्षा देण्यास सक्षम आहेत, असे कौतुकोद्गारही करुणा शर्मा यांनी काढले.

karuna Sharma On Walmik Karad .jpg
BJP national president : जगातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पेच कधी सुटणार?

रणजीत कासले नेमकं काय म्हणालेले..?

बीडचे निलंबित पोलीस निरीक्षक रणजीत कासले यांच्या सोशल मिडियावरील व्हिडिओने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत कासले यांनी आपल्याला वाल्मीक कराडच्या एन्काॅऊटरची आॅफर देण्यात आली होती, असा दावा केला. माझ्या नोकरीची, कुटुंबाची काळजी होती, म्हणून मी गप्प होतो. आता मला निलंबित केले आहे, तसाही मी रस्त्यावरच आलोय, म्हणून आता बोलतोयं, असंही रणजीत कासले यांनी सांगितले. पंचवीस किंवा पन्नास करोड तुम्ही मागाल तेवढी रक्कम तुम्हाला दिली जाते, असे मला वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देताना मला सांगितले गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com