BJP national president : जगातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पेच कधी सुटणार?

BJP leadership crisis News : जवळपास 12 राज्यांच्या संघटनात्मक निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. त्यानंतरही भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड लांबणीवर पडली आहे.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद जवळपास गेल्या दहा महिन्यापासून रिक्त आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांची मुदत जून 2024 रोजी संपली आहे. त्यानंतर नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी राष्ट्रीय सदस्यता मोहीम पूर्ण झाली आहे. जवळपास 12 राज्यांच्या संघटनात्मक निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. त्यानंतरही भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड लांबणीवर पडली आहे.

भाजपचा (BJP) नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याची उत्सुकता सर्वाना लागली आहे. देशातील विविध राज्यातील संघटनात्मक निवडणुका पूर्ण होत नसल्याने ही निवड प्रक्रिया गेल्या अनेक दिवसापासून रखडली होती. आता काही राज्यातील संघटनात्मक निवडी पूर्ण झाल्याने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते. ही निवड प्रक्रिया संघटनात्मक, राजकीय आणि धोरणात्मक पातळीवरच्या कारणामुळे रखडली असल्याचे समजते.

BJP Flag
BJP Mumbai Chief News : भाजप मुंबईचा सेनापती बदलणार; अध्यक्षपदासाठी 'या' दोघांमध्ये रस्सीखेच

18 राज्यांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक घेण्यात येते. तथापि, ते बंधनकारक नसल्याचे एका भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. ‘जर पक्षाच्या घटनेच्या कलम 19 अंतर्गत राष्ट्रीय परिषद 5 राज्यांमध्ये निवडली गेली असेल तर निवडणूक समिती कोणतेही 20 सदस्य संयुक्तपणे राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव प्रस्तावित करू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. नवीन अध्यक्षांच्या घोषणेनंतर राष्ट्रीय परिषद आणि कार्यकारिणीत महिलांना 33 टक्क्यांपर्यंत जागा देण्याची योजना आहे. संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीत महिलांचे प्रतिनिधित्व वाढणार आहे.

BJP Flag
Mahayuti Goverment: महायुती सरकारमध्ये फडणवीस, अजितदादांविरुद्ध एकनाथ शिंदे असा छुपा संघर्ष? एकापाठोपाठच्या 'या' घटनांमुळे संशय बळावला

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जवळपास सहा नावाची चर्चा आहे. त्यामध्ये एक नाव महाराष्ट्रातील आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav), धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे, शिवराज सिंग चौहान, मनोहरलाल खट्टर, डी. पुरंदरेश्वरी या ज्येष्ठ नेत्यांची नावे सध्या आघाडीवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली. आता यामधील भाजपच्या अध्यक्षपदी कुणाच्या नावाची वर्णी लागणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. भाजपच्या नव्या अध्यक्षाबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.

BJP Flag
Congress Internal Politics: काँग्रेस नव्या वळणावर! अधिवेशनातील कडू डोस लागू होणार, संघटनात्मक बदल नेत्यांच्या पचनी पडणार का ?

भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीमध्ये अनेक गोष्टी महत्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामध्ये प्रादेशिक संतुलन, महिला नेतृत्व, दलित प्रतिनिधीत्व आणि संघटन कौशल्य या मुद्द्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती सूत्राने दिली. दरम्यान, देशातील बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये काही दिवसातच संघटनात्त्मक निवडणूका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

BJP Flag
Shivsena UBT Vs NCP : उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का! 'मशाल' सोडलेल्या शिलेदाराने बांधले अजितदादांचे 'घड्याळ'

दरम्यान, भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड एप्रिल महिन्यात होईल, असे सांगितले जात होते. भाजपचा स्थापना दिवस ६ एप्रिलला होतो. तत्पूर्वी भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाची घोषणा होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्याला आठ दिवस उलटले तरी घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे कधी घोषणा केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

BJP Flag
Congress vs BJP Maharashtra : दोन उपमुख्यमंत्र्यांना 'मॅनेज' करतानाच फडणवीसांची दमछाक; हर्षवर्धन सपकाळांच्या टोल्यानं महायुती 'घायाळ'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com