

Vishwas Nangare Patil: आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी नुकतीच एका हिंदू संघटनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली, याठिकाणी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केली. या स्तुतीसुमनांमुळं ते आता चांगलेच अडचणीत आले आहेत. काँग्रेसनं त्यांच्यावर हल्लाबोल केला असून हे कसले कर्तव्यदक्ष आययपीएस अधिकारी? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
काँग्रेसनं नांगरे पाटलांच्या या कृतीवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसनं म्हटलं की, संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले, राग दरबारी गाण्या संघाच्या दारी हजर झाले! एका बाजूला भारतीय संविधानाची शपथ घेऊन, जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी अंगावर घेणार आणि दुसऱ्या बाजूला दिवसाढवळ्या समाजात द्वेष पसरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) जाहीर स्तुती करणार, हे कसले कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी? असा सवालही यावेळी ठाकरेंनी विचारला आहे.
शासकीय सेवेत असताना अशा प्रकारे एका विशिष्ट विचारसरणीची आणि द्वेष पसरवणाऱ्या संघटनेची चाटूगिरी करणे म्हणजे लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे. पोलिसांचे काम समाजात कायदा व्यवस्था राखणे आहे, की अशा विद्वेष पसरवणाऱ्या संघटनांचे गुणगान गाणे? संघाच्या लोकांनी दंगली घडवल्या हा इतिहास यांना माहिती नाही की काय?
आता या महाशयांची बदली नागपूरला झाली आहे. बरं झालं, ज्यांची सेवा करायची आहे, आता थेट त्यांच्याच चरणी जाऊन सेवा करण्याची संधी यांना मिळाली आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जनतेच्या पैशावर पगार घेणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेतलेले सरकारी नोकर आहात, देशद्रोही संघाचे स्वयंसेवक नाही. वर्दीचा गैरवापर करून जर राजकीय आणि धार्मिक अजेंडा राबवणार असाल, तर नागपूर आणि महाराष्ट्राची संविधानप्रेमी जनता हे खपवून घेणार नाही!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.