Rohit Pawar News : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. शिखर बँक घोटाळ्यातील अतिरीक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे यांनी आव्हान देण्याचे ठरवले आहे. अण्णांनी ही भूमिका घेताच आमदार रोहित पवार यांनी यावर टिप्पणी केली आहे.
"लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला चांगलं यश मिळाले नाही. आता लगेचच शिखर बँकेबाबत कोणी आक्षेप नोंदवत असेल तर, विचार करावा लगेल. 'युज अँड थ्रो', अशी भाजपची प्रवृत्ती दिसते", असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील राजकीय संबंधांवर संशय व्यक्त करत मीठ चोळलं आहे.
अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांनी वकिलांमार्फत पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला आहे. न्यायालयाने हा आक्षेप मान्य करत अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांना निषेध याचिका दाखल करण्यास वेळ दिला आहे. यावर 29 जुनला पुढची सुनावणी होणार आहे. मुंबई (Mumbai) पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखे पोलिसांना अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिट देत क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. मात्र अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांनी यावर आक्षेप घेतल्याने आमदार रोहित पवार यांनी याबाबत वेगळीच शंका व्यक्त केली आहे. यामागे भाजप असल्याचा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. 'भाजप हा पक्ष लोकनेत्यांना संपवतो, हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय', असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी याबाबत केलेल्या ट्विटमधील पोस्टमध्ये अजितदादांबाबतचा भाजप करत 'युज अँड थ्रो'कडे लक्ष वेधले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) आॅर्गनायझरमधून अजितदादांमुळे भाजपने स्वतःची ब्रॅण्ड व्हॅल्यू संपवल्याची टीका झाली. नंतर दहा वर्षे शांत झोपलेल्या कथिक गांधींनी अचानक जागे होऊन शिखर बँक प्रकरणी अजितदादांच्या क्लीन चिटविरोधात न्यायालयात जाण्याची घेतलेली भूमिका.. आणि काल राज्यसभेचा अर्ज भरताना एकाही भाजपेयीची नसलेली उपस्थिती हा घटनाक्रम लक्षात घेण्यासारखाच आहे. 'युज अँड थ्रो' ही भाजपची प्रवृत्ती असून त्यानुसारच अजितदादांसोबत वागत आहेत, हा क्लिअर मेसेज आहे, असे रोहित पवार यांनी म्हणत भाजपला डिवचले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता उमेश पाटील यांनी देखील अण्णा हजारे यांच्या या भूमिकेवर आक्षेप नोंदवला आहे. 'अण्णा, अजितदादांना बदनाम करण्याच्या मोहिमेत कोणाच्या तरी हाताचे हत्यार बनू नका. हीच आमची तुम्हाला विनंती आहे', असे उमेश पाटील यांनी म्हटले आहे. अण्णा हजारे यांनी क्लोजर रिपोर्टबाबत घेतलेली आव्हानाची भूमिका पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध अण्णा, असा संघर्ष होऊ शकतो. यात आमदार रोहित पवार यांनी केलेले भाष्य भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील राजकीय संबंधांना संघर्षात तेल ओतण्याचे काम करू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.