Sangli DCC Bank : निवडणूक संपताच सहकार विभागाची कारवाई; जिल्हा बँकेच्या आजी-माजी संचालकांंसह 41 जणांना नोटीस

Political News : सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे 50.58 कोटींचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी बॅँकेच्या आजी-माजी संचालक व अधिकार्‍यांसह 41 जणांना नोटीस बजावली आहे.
Sangali DCC Bank
Sangali DCC Bank Sarkarnama

Sangli News : लोकसभा निवडणुकीची धामधूम संपताच जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे 50.58 कोटींचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी बॅँकेच्या आजी-माजी संचालक व अधिकार्‍यांसह 41 जणांना नोटीस बजावली आहे. याबाबत 27 जून रोजी म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. चौकशी अधिकारी तथा कोल्हापूर शहर उपनिबंधक डॉ. प्रिया दळणकर यांनी नोटीसा बजावल्या आहेत.

जिल्हा बॅँकेत (Sangli DCC Bank) मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या काही निर्णयाबाबत सहकार आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. यावर सहकार आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले. यात संबधित तक्रारीत तथ्य आढळल्याने महाराष्ट्र नागरी सहकारी संस्था अधिनियमय 1960 मधील कमल 83 अंतर्गत बॅँकेची चौकशी करण्यात आली.

या चौकशीतही संबंधित तक्रारीत तथ्य आढळले असून तत्कालीत संचालकांनी घेतलेल्या निर्णयामुळे चार प्रकारणात बॅँकेचे 50 कोटी 58 लाख 87 हजाराचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका यात ठेवण्यात आला.

या नुकसानीची संबधितांवर जबाबदारी निश्चित करून वसुलीसाठी कलम 88 अंतर्गत चौकशीची शिफारस करण्यात आली. त्यानुसार आता कलम 88 अंतर्गत चौकशीचे आदेश दिले होते. बॅँकेकडून चौकशीसाठी अत्यावश्यक कागदपत्रे मागील महिन्यात मागवून घेतली. यानंतर आता 88 मधील कलम 72 (2) नुसार बॅँकेच्या मागील व विद्यमान संचालक मंडळातील सर्व आजी-माजी संचालक तसेच विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ (Shivajirao Wagh) यांच्यासह मागील संचालक मंडळाच्या काळातील अधिकार्‍यांना नोटीस बजावली आहे.

महांकाली, माणगंगा साखर कारखान्यांच्या खरेदीत 1.97 कोटीचे नुकसान, जिल्ह्यातील 763 विकास संस्थांच्या संगणकीकरणावर अनावश्यक 14.67 कोटी खर्च, नॉन बॅँकीग असेट खरेदीत चुकीचा जमाखर्च केल्याने 22.42 कोटी तसेच महांकाली कारखान्याच शिल्लक व खराब साखर विक्रीत 11.51 कोटीचे नुकसान झाल्याचा ठपका आहे.

Sangali DCC Bank
Raj Thackeray : राज ठाकरेंनी भूमिकेवर ठाम राहावे, अन्यथा मनसेची पुन्हा पीछेहाट!

याबाबत 27 जून रोजी कोल्हापूर येथील उपनिबंधक कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली असून यावेळी स्वत: अथवा वकील, प्रतिनिधीच्या माध्यमातून सबळ लेखी कागदोपत्री खुलासा सादर करण्यात सांगण्यात आले.

सहकार मंत्र्यांकडे अपील करणार

जिल्हा बॅँकेच्या नुकसानानीस आजी-माजी संचालक जबाबदार नाहीत. ही चौकशी चुकीची आहे. याप्रकरणी नोटीस मिळताच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे (Dilip Walse-Patil ) अपील केले जाणार आहे. ज्या प्रकरणात बॅँकेचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्यात संचालकांनी एकही रुपयांचा भ्रष्टाचार केलेले नाही. चौकशी अहवालातही तसे म्हटलेले आहे. त्याला संचालक जबाबदार ठरत नसल्याचे माजी संचालक प्रतापराव पाटील (Prataprao Patil ) यांनी सांगितले.

Sangali DCC Bank
Devyani Pharande : आमदार देवयानी फरांदे यांची हॅटट्रिक शक्य आहे का?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com