Beed Politics : बीडमधील राजकारणात बाहुबली, कटप्पा, शिवगामी कोण ? अंजली दमानियांचा सूचक इशारा

Bahubali in Beed News : गेल्या काही दिवसांपासून खून, घोटाळ्याने बीड जिल्हा राज्याच्याच नाही तर देशाच्या नकाशावर आला आहे. त्यातच आता दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोपांची मालिका सुरू झाल्यानंतर राजकारणात आता नवीन वादळ येणार का ? अशी चर्चा रंगली आहे.
anjali damaniya
anjali damaniya sarkarnama
Published on
Updated on

Beed News : सुरेश धस यांच्या आष्टीमध्ये बाहुबली सिनेमाचा बुधवारी खेळ रंगल्याचा अनुभव आला. या कार्यक्रमावेळी धस अण्णांनी नेहमीच्या शैलीत बॉलिवूड टच दिला. दिवारपासून ते बाहुबलीपर्यंत सगळ्या सिनेमांचे दाखले अण्णांनी यावेळी दिले. सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख बाहुबली असा केला. पंकजा मुंडे जेव्हा बोलायला उभ्या राहिल्या तेव्हा त्यांनी सुरेश धस यांच्या भाषणाचा उल्लेख करत ते मला शिवगामी देवी म्हणत होते असे म्हटले. यावेळी भाजप आमदार सुरेश धस, पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत तुफान फटकेबाजी केली. त्यानंतर त्यावरच भाष्य करताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सूचक वक्तव्य केले. बीड जिल्ह्यातील राजकारणात बाहुबली, कटप्पा, शिवगामी, बल्लालदेव कोण हे पाहावे लागेल, असे स्पष्ट केले.

आष्टीतील कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपण शिवगामीच्या भूमिकेत असल्याचे तर देवेंद्र फडणवीस हे बाहुबली असल्याचे वक्तव्य केले होते. गेल्या काही दिवसांपासून खून, घोटाळ्याने बीड जिल्हा राज्याच्याच नाही तर देशाच्या नकाशावर आला आहे. त्यातच आता दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात आरोपांची मालिका सुरू झाल्यानंतर राजकारणात आता नवीन वादळ येणार का ? अशी चर्चा रंगली आहे.

anjali damaniya
Shivsena UBT Politics : विधानसभा गमावली पण महापालिकेसाठी शिवसैनिकांना चेतविण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे रणनीती बदलणार?

दमानिया यांनी धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना पावणे तीनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. हे आरोप मुंडे यांनी फेटाळून लावत त्या बदनामिया असल्याचा आरोप केला. त्यानंतर गुरुवारी अंजली दमानिया यांनी त्यांच्या आरोपांना, दाव्यांना पुष्टी देण्यासाठी त्या उत्पादनाची ऑनलाईन खरेदी करून दाखवली आणि मुंडे कसे खोटे बोलत आहेत, ते मांडले. यावेळी त्यांनी ब्रँड स्प्रे, आणि इफकोचा नॅनो युरियाचे काही प्रोडक्ट विकत घेतले. राज्य सरकारने ह्या बाटल्या 220 रुपयाने विकत घेतल्या, असे त्यांनी या खरेदीतून दाखवले.

anjali damaniya
Pankaja Munde Vs Suresh dhas : 'शिवगामी' पंकजा मुंडेंनी आष्टीत जाऊन आमदार धसांचा मागचा पुढचा असा सगळाच हिशोब चुकता केला...

राज्यातील दोन मोठ्या नेत्यांचे धनंजय मुंडें जवळचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही, असा खळबळजनक दावा दमानिया यांनी केला. मनोज जरांगे हे पण याबाबत बोलत आहेत, ही मोठी गोष्ट आहे. विष्णू चाटेनी बड्या नेत्याला फोन केल्याचा, संशय आहे हे आधीच सांगितले आहे. विष्णू चाटेने धनंजय मुंडेंना फोन केला का? हा महत्वाचा विषय आहे, असे दमानिया म्हणाल्या.

anjali damaniya
Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी टायमिंग साधलं; फडणवीसांसमोरच धसांना ठणकावले

वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्या म्हणून अशोक मोहिते नावाच्या तरूणाला मारहाण झाली हे संतापजनक आहे, हेच वाढदिवसाचे स्टेटस ठेवत आहेत, हे साफ चुकीचे आहे. ही दहशत माजवण्याचा प्रकार आहे, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.

anjali damaniya
Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंना मोठा झटका; करुणा मुंडेंचे आरोप कोर्टाकडून मान्य, दिले महत्वाचे आदेश

बीडचा कटप्पा कोण ? हे पाहावे लागेल, शिवगामी कोण? बल्लालदेव कोण असे सगळे प्रकार संतापजनक आहे. बीडमध्ये जे राजकारण सुरू आहे ते चुकीचे आहे. राजकारणी एकमेकांना मदत करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील राजकारणात बाहुबली, कटप्पा, शिवगामी, बल्लालदेव कोण हे पाहावे लागेल असे सूचक वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले.

anjali damaniya
Anjali Damania News :'त्यात तुमचीच अब्रु जाईल...', अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com