Nitin Deshmukh : गोपीचंद पडळकरांना नडणाऱ्या नितीन देशमुखांचा इतिहास साधा नाही, 'राष्ट्रवादी'चा कट्टर कार्यकर्ता, आव्हाडांचा विश्वासू!

Who is Nitin Deshmukh : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नितीन देशमुख हे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. जितेंद्र आव्हाड यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात.
Nitin Deshmukh
Nitin Deshmukhsarkarnama
Published on
Updated on

Nitin Deshmukh VS Gopichand Padalka : विधानभवन परिसरात गुरुवारी तुफान राडा झाला. गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले आणि चार जणांनी मिळून जितेंव्ह आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण केली. देशमुख आणि टकले एकमेकांव धावून गेले. या मारहाणीत देशमुख यांचे शर्ट देखील फाटले. दरम्यान विधान भवानातील राड्यानंतर नितीन देशमुख हे चर्चेत आले आहे.

नितीन देशमुखांची मूळ ओळख म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते. राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत राहिले. जेव्हा अजित पवारांनी पहाटे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली होती. तेव्हा देशमुख हे अजित पवारांच्या विरोधात घोषणा देण्यात आणि आंदोलन करण्यात आघाडीवर होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नितीन देशमुख हे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. जितेंद्र आव्हाड यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. घाटकोपरमधील स्थानिक राजकारणातही त्यांचा प्रभाव आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील ते सक्रीय होते. प्रवक्तेपदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे होती. राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. आक्रमक भाषेसाठी आणि जशाच्या तसे उत्तर देण्यासाठी देखील देशमुख प्रसिद्ध आहेत. देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यात दोनच दिवसांपूर्वी गाडीचा दरवाजा लागल्याने वाद झाला होता.

Nitin Deshmukh
Rohit Pawar: बीडनंतर आता सांगलीत नवा आका तयार होतोय! त्याला वेळीच आवरा! रोहित पवार सरकारवर भडकले

आव्हाडांनी देशमुखांसाठी केली होती खास पोस्ट

दोन जुलैला नितीन देशमुख यांचा वाढदिवस होता. त्या दिवशी जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटवरून देशमुख यांच्यासाठी खास पोस्ट केली होती. त्यामध्ये म्हटले होते की, अवघड प्रसंगात साथ देणारी माणसे सध्याच्या वातावरणात राजकारणात फार कमी दिसतात, माझ्या बरोबर असलेला नितीन देशमुख हा कायमच माझ्या अवघड प्रसंगात माझ्या सोबत राहिला. माझ्यासाठी ज्या कार्यकर्त्यांना माझ्या पुढे छातीचा कोट करून लढताना पाहिले त्यातील एक असणाऱ्या नितीन देशमुख या माझ्या शंभर किलोच्या तरुण सहकाऱ्याला वाढदिवसाच्या शुभेचा

Nitin Deshmukh
Assembly Session : राड्यानंतर अजितदादा, जयंतरावांनी अध्यक्षांना सुचवला ‘कडक’ पर्याय; राहुल नार्वेकर कारवाईबाबत करणार मोठी घोषणा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com