Winter Session 2025 : ऐन थंडीत राजकीय वातावरण तापणार; 'या' 11 विधेयकांमुळे हिवाळी अधिवेशन गाजणार..!

Maharashtra winter session 11 bills : महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात 11 महत्त्वाच्या विधेयकांमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता. अधिवेशनातील मुख्य मुद्दे आणि घडामोडी जाणून घ्या.
Nagpur Winter Session
Nagpur Winter SessionSarkarnama
Published on
Updated on

नागपूरमध्ये 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू आहे. अधिवेशनामुळे संपूर्ण सचिवालयाचे कामकाज मुंबईहून नागपूरला हलवण्यात आले असून, संबंधित विभागांनी बहुतेक तयारी पूर्ण केली आहे. अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहांमध्ये एकूण अकरा विधेयक सादर होणार असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये सहा अध्यादेश पटलावर ठेवले जाणार असून, पाच नवीन विधेयकांचा समावेश असेल. ही नवीन विधेयके नेमकी कोणत्या विषयांशी संबंधित असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिवेशनासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता आणि देखभाल कामे करण्यात आली आहेत. विधानभवन परिसरासह सिव्हिल लाइन्स आणि आसपासच्या महत्त्वाच्या भागातील रस्ते दुरुस्त करून व्यवस्थित करण्यात आले आहेत. बांधकाम विभागाने अधिवेशनाशी निगडित बहुतांश कामे पूर्णत्वास नेली असून, मंत्र्यांसाठी तयार करण्यात आलेल्या सोळा नव्या दालनांचे कामही अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी विधिमंडळ सचिवालयाकडे असून, त्यांनीही आपले नियोजन सुरू केले आहे.

Nagpur Winter Session
Dr Babasaheb Ambedkar : 'बोधिसत्व' शांत झाले! 6 डिसेंबरच्या 'त्या' 24 तासांत नेमकं काय घडलं? महामानवाच्या निधनापूर्वीची 'ती' शेवटची रात्र!

या वर्षीचे अधिवेशन केवळ सात दिवसांचे असणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही सभागृहाचे कामकाज होणार आहे. त्यामुळे काही दिवस अधिवेशनाची वेळ रात्री उशिरापर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 8 डिसेंबरला पुरवणी मागण्या सादर केल्या जाणार आहेत. या मागण्यांची रक्कम हजारो कोटींमध्ये असण्याची शक्यता असून, यावर चर्चा होणार आहे. त्याच दिवशी दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोक प्रस्तावही सभागृहात मांडला जाणार आहे.

Nagpur Winter Session
Devendra Fadnavis : इंदू मिल स्मारक 'या' तारखेपर्यंत पूर्ण होणार! फडणवीसांनी थेट डेडलाईनच सांगितली, पाहा काय म्हणाले...

एकूणच, या संक्षिप्त पण महत्त्वपूर्ण अधिवेशनात सरकार कोणती नवी विधेयके मांडते, अध्यादेशांवर किती चर्चा होते आणि पुरवणी मागण्यांवर काय निर्णय घेतले जातात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. नागपूर शहरातही अधिवेशनामुळे प्रशासन आणि सुरक्षेची हालचाल जाणवत असून, सर्व विभाग समन्वयाने तयारीला लागले आहेत. हिवाळी अधिवेशनाचा हा आठवडा राजकीय दृष्ट्या महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com