Women Empowerment : लाडक्या बहिणींनो 1500 रुपये विसरा, 'हे' सरकार देतंय 10 हजार रुपये! 75 लाख महिलांना फायदा

Bihar Women RJDU BJP Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुख्यमंत्री स्वयंमरोजगार योजनेची सुरुवात आजपासून होत आहे. या योजनेतून तब्बल दहा हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.
Bihar government to provide ₹10,000 assistance to women under the Chief Minister’s Self Employment Scheme. A boost for women’s empowerment and self-reliance.
Bihar government to provide ₹10,000 assistance to women under the Chief Minister’s Self Employment Scheme. A boost for women’s empowerment and self-reliance.sarkarnama
Published on
Updated on

Bihar Election : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना ही लोकप्रिय झालेली आहे. महायुती सरकारने निवडणुकीच्या आधी ही योजना सुरू करून पात्र महिलेला 1500 रुपये दिले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहि‍णींनी महायुतीला मोठ्या प्रमाणात मतदाने केले. महिलांना थेट आर्थिक लाभ देण्याचा योजनांचा फायदा निवडणुकीत होत असल्याचे समोर आल्याने बिहार सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे.

बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेची आजपासून सुरुवात होत असून या योजनेतून तब्बल 75 लाख महिलांच्या खात्यावर प्रत्येकी 10 हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत सरकारने दिलेल्या पहिल्या 10 हजारांच्या हफ्त्यातून महिला आपला आवडीचा स्वयंरोजगार सुरू करू शकतात.

या योजनेच्या सहा महिन्यानंतर महिलेच्या स्वयंरोजगाराचे मुल्यमापन करून तब्बल दोन लाखांपर्यंत अतिरिक्त मदत सुद्धा करण्यात येणार आहे. ही योजना बचत गटांना देखील लागू असून महिलांना आर्थिक मदतीसोबत कार्य प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे.

Bihar government to provide ₹10,000 assistance to women under the Chief Minister’s Self Employment Scheme. A boost for women’s empowerment and self-reliance.
Priyanka Gandhi: बिहारच्या रिंगणात आता प्रियंका गांधींची एन्ट्री! काँग्रेसचा मोठी रणनीती

महिलांनी या योजनेतून तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी बाजार विकसीत करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे तसेच महिलांना त्यांचा माल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील मदत केली जाणार आहे.

कोणाल मिळणार लाभ?

बिहारमधील महिलांना या योजनाचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी काही अटी देखील घालण्यात आल्या आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र महिलेचे वय हे 18 ते 60 च्या दरम्यान असावे, बारावी किंवा दहावीनंतर दोनवर्षांचा कोर्स तसेच आयटीआय, पाॅलटेक्निक डेप्लोमा या समकक्ष शिक्षण घेतलेले असावे. तसेच अर्ज करणाऱ्या महिलेच्या घरातील व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी. तसेच आयकर भरणाऱ्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Bihar government to provide ₹10,000 assistance to women under the Chief Minister’s Self Employment Scheme. A boost for women’s empowerment and self-reliance.
Pune traffic : 102 कोटी पाण्यात; उतारा म्हणून पुणे पोलीस आयुक्तांनी आणला तब्बल 1100 कोटींचा प्रकल्प

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com